Sugarcane Rate Protest : राजू शेट्टींची आरपारची लढाई, ऊस दरासाठी बेमुदत राष्ट्रीय महामार्ग रोखणार

Hasan Mushrif : माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
Sugarcane Rate Protest
Sugarcane Rate Protestagrowon

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये आणि यावर्षीच्या उसाला तीन हजार ५०० पहिली उचल द्यावी या मागणीसाठी मागच्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, दोन दिवसांत निर्णय न झाल्यास गुरूवारी बेमुदत (ता. २३) राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांकडे एफआरपी पेक्षाही जादा पैसे देणे लागतं परंतु यांना द्यायचे नसल्याने स्वयंघोषीत समिती करून हे आंदोलन मोडीत काढण्याचा यांचा प्रकार आहे. परंतु कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत पाहण्याचे काम पाहू नये श्री शेट्टी म्हणाले.

याचबरोबर जिल्हाधिकारी यांना फोन करून उद्याच्या बैठकीबाबत विचारणा केली असता त्यांनी बैठक घेण्याचा प्रश्न नाही कारखानदारांनी हिशोब दिला आहे. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. याचा बोलवता धनी जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील असल्याचे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं. माझ्यासोबत काही कारखानदार चर्चेसाठी तयार होते परंतु काही कारखानदारांनी बोलणी करत असलेल्या कारखानदारांवर दबाव टाकून चर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

शेट्टी पुढे म्हणाले, जिल्ह्यातल्या सगळ्याच साखर कारखानदारांनी एकजूट करून काही झालं तरी शेतकऱ्यांना पैसा द्यायचा नाही. हे आंदोलन मोडून काढायचं ठरवलेलं आहे. परंतु आम्हीही आता मैदान सोडायचं नाही कारखानदार एक होत असतील तर आम्ही शेतकरीही या कारखानदारांना आमच्यापुढे झुकायला लावल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा सज्जड इशारा दिला.

Sugarcane Rate Protest
Raju Shetti Protest : 'स्वाभिमानी'चे उद्या चक्का जाम आंदोलन, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होणार रास्ता रोको

राजू शेट्टींचा समितीबाबत खुलासा

जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी दिलेल्या अहवालानुसार कारखानदार आता कोणतेही देणे लागत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे परंतु आमच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ९ कारखानदार जवळपास १५० ते ३०० रुपये जादा दर देणे शक्य आहे परंतु त्यांनी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मी यापूर्वीच समिती नेमण्याचा विरोधात होतो आणि यापुढेही विरोधात राहणार आहे. कारखानदार नेमकी काय भूमिका मांडतात याकडे माझे लक्ष होते म्हणून मी समितीच्या एका बैठकीला उपस्थित असल्याचा खुलासा केला.

या कारखानदारांकडे एवढे शिल्लक

डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना - १७० रुपये, बिद्री सहकारी साखर कारखाना - ३२८, संताजी घोरपडे - १९४, कुंभी सहकारी साखर कारखाना १३७, दत्त साखर कारखाना शिरोळ २८१, गुरदत्त साखर कारखाना शिरोळ - १२७, शरद सहकारी साखर कारखाना - १०२, पंचगंगा सहकारी साखर कारखाना(रेणुका शुगर्स) - २४५, जवाहर सहकारी साखर कारखाना - २७१ रुपये देणे लागतात अशी माहिती शेट्टी यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com