Fuel Jizya Tax: इंधनावर जिझिया कर आकारून जनतेची लूट

Congress State President Harshvardhan Sapkal: जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरत असतानाही देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. काँग्रेसने भाजप सरकारवर इंधनावरील अन्यायकारक कर वाढवून जनतेची लूट सुरू असल्याचा आरोप केला आहे.
Congress State President Harshvardhan Sapkal
Congress State President Harshvardhan SapkalAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : ‘‘जागतिक बाजारात क्रूड ऑइलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल ६५ डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयांच्या आसपास, तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहे. भाजप सरकार इंधनावर अन्यायकारक जिझिया कर आकारून जनतेची लूट करीत आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

Congress State President Harshvardhan Sapkal
Indian Politics: आर्थिक भूकंपाकडे लक्ष

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, की क्रूड ऑइलचे कमी झालेले दर व कररूपी लूट कमी केली, तर पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटर करणे शक्य आहे, ते सरकारने करून जनतेला दिलासा द्यावा. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर १४५ डॉलर प्रति बॅरलवर पोहचले असतानाही पेट्रोल ७० रुपये लिटर, तर डिझेल ४५ रुपये लिटर होते.

आता क्रूड ऑइल ६५ डॉलर आहे, तरीही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाहीत. युपीए सरकार सत्तेत असताना पेट्रोलवर ९.५६ रुपये, तर डिझेलवर ३.४८ रुपये अबकारी कर होता, तो भाजप सरकारने वाढवत ३२ रुपयांपर्यंत केला. काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू असताना एक्साईज टॅक्समध्ये २ रुपयांची वाढ झाली. १ रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता तो आता १८ टक्के केला आहे आणि वरून टोल वसुलीही सुरू आहे, तसेच कृषी सेस लावून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे.

Congress State President Harshvardhan Sapkal
Parliament Session: रंगतदार आणि संस्मरणीय अधिवेशन

एलपीजी सिलिंडरसुद्धा ४०० ते ४५० रुपये होता तो आता दुप्पट झाला आहे. आजच एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे, ही लूट तत्काळ थांबवावी, असेही सपकाळ म्हणाले. रशियातील तेलाचा फायदा ‘रिलायन्स’, ‘नायरा’ला ‘‘रशिया भारताला बाजारभावापेक्षा ३० टक्के कमी दराने क्रूड ऑइल देते, त्याचा थेट फायदा हा रिलायन्स व नायरा या दोन कंपन्यांना होतो. या दोन कंपन्या सरकारच्या लाडक्या आहेत का, क्रूड तेलाच्या किमती कमी होत असताना त्याचा फायदा ऑइल कंपन्यांना होत आहे.

स्वस्तातले क्रूड ऑइल घेऊन या कंपन्या युरोपमध्ये विकून नफेखोरी करीत आहेत. युपीए सरकार सत्तेत असताना पेट्रोल २ रुपयांनी वाढले, तर ट्विट करणारे अमिताभ बच्चन, अक्षयकुमार सारखे सेलिब्रिटी आणि बाबा रामदेव सारखे स्वयंघोषित संत आता पेट्रोल १०९ रुपयांवर असतानाही गप्प आहेत. तर एलपीजी सिलिंडर १५ रुपयांनी वाढले तर रस्त्यावर उतरणारे आता कोठे गायब झाले आहेत? असा प्रश्न करून तेलाचा हा जो काळा खेळ सुरू आहे, त्यावर सरकारने एक श्वेतपत्रिका काढावी,’’ अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com