Lonar Tourism Festival : लोणार पर्यटन महोत्सवाला हिरवी झेंडी

Lonar Sarovar : जिल्ह्यातील जगप्रसिद्द लोणार सरोवराचे महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी या वर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
Lonar Tourism Festival
Lonar Tourism Festival Agrowon
Published on
Updated on

Buldana News : बुलडाणा : जिल्ह्यातील जगप्रसिद्द लोणार सरोवराचे महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी या वर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्रालयातील त्यांच्या दालनात त्यांनी लोणार सरोवराबाबत बैठक घेतली. या वेळी मंत्री देसाई बोलत होते. या बैठकीत माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

Lonar Tourism Festival
Lonar Lake : लोणार सरोवराच्या गुलाबी पाण्याने बदलला रंग?

जगात उल्कापातामुळे झालेली तीन सरोवरे आहेत. त्यापैकी एक बुलडाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये आहे. त्याचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी राज्याच्या पर्यटन विभागातर्फे या वर्षीपासून पर्यटन महोत्सव घेणार असल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी या वेळी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन त्याची तारीख व वेळ घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

विकासकामांना गती द्या

लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरात जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत. यासाठी विकास कामांना गती देण्याचे निर्देशही देसाई यांनी दिले. संशोधनासाठी नासाचे शास्त्रज्ञही बराच वेळा येथे येत असतात. त्यामुळे योग्य सुविधा त्या ठिकाणी देण्यासाठी सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्याबाबत देसाई यांनी सांगितले. पर्यटक लोणार सरोवराकडे आकर्षित व्हावेत यासाठी त्या ठिकाणी तारांगण, संग्रहालय, चिल्ड्रन पार्क, गार्डन एमटीडीसीचे रेस्ट हाऊसचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केली.

‘विकास निधी कमी पडू देणार नाही’

पर्यटन विभागाकडून दिला जाणारा विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी या वेळी सांगितले. या ठिकाणी पर्यटकांना सोयीचे व्हावे म्हणून रोप-वेची सुविधा करता येईल का या संदर्भात संबंधित विभागांशी चर्चा करून काम सुरू करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. तसेच इतर काही अडचणी असतील तर त्या स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सोडवण्याचे निर्देशही श्री. देसाई यांनी या वेळी दिले. या वेळी त्यांनी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्याशी फोनवरून चर्चा करून विकासकामांना गती देण्याच्या सूचना केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com