Swapnil Shinde
सह्याद्री पर्वतरागांमध्ये विविध जैवविविधता आणि दुर्मिळ प्राण्यांच्या जाती आढळून येत असतात.
सह्याद्रीच्या तीन व्याघ्र प्रकल्पामध्ये विविध प्राण्यांसह ८ पट्टेरी वाघ आणि ४ चार ब्लॅक पँथर आढळून आल्याच्या नोंदी आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळील गोवेरी, भैरवगड परिसर, आंबोली आणि तिलारीच्या जंगलात यापूर्वी ब्लॅक पॅंथरच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत.
आता पुन्हा कोल्हापूर येथील मिलिंद गडकरी यांना गुरुवारी संध्याकाळी आंबोलीमध्ये काळ्या बिबट्याचे दर्शन झाले.
काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच दिसतो.
पण त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो.
या ब्लॅक पँथरमुळे सह्याद्री दुर्मीळ वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण असल्याचे समोर झाले आहे.