Lemon Price: लिंबाचे दर उसळले! फेब्रुवारीतच ५ हजारांवर भाव

Market Update: ऑक्टोबरच्या अवकाळी पावसामुळे लिंबाच्या बहराला मोठा फटका बसला, परिणामी बाजारात लिंबाची आवक घटली आणि किंमत ५ हजारांवर पोहोचली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबाला वाढती मागणी असल्याने पुढील काळात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Lemon
LemonAgrowon
Published on
Updated on

Akola News: ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे लिंबू बहराला फटका बसला. त्यानंतर धुक्यामुळे काही बहर गळाल्याने यंदा बागांमध्ये झाडांवर लिंबांची संख्या अत्यंत कमी आहे. बहर फुटला नसल्याने बाजारात कमी आवक होत आहे. परिणामी यंदा फेब्रुवारी महिन्यातच लिंबाचा दर पाच हजार रुपयांपर्यंत गेला आहे. येत्या काळात यात आणखी मोठ्या वाढीचा कल दिसून येत असल्याचे शेतकरी व खरेदीदारही सांगत आहेत.

अकोला जिल्ह्यात वाडेगाव ही लिंबासाठी मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्यात लिंबाची लागवड तीन ते चार हजार हेक्टरपर्यंत असल्याने या ठिकाणी स्थानिक मालाची आवक मोठी होत असते. सध्या या बाजारात एक टनापर्यंतही आवक होत नसल्याचे खरेदीदार सांगत आहेत.

Lemon
Lemon Rate : कळमना बाजारात लिंबाला चार- पाच हजार रुपये दर

उन्हाळ्याची चाहूल लागताच दर वर्षी लिंबाला मागणी वाढू लागते. यंदा बागांमध्ये बहर फुटलेला नसल्याचा फटका उत्पादनावर झाला आहे. बाजारात लिंबाची मागणी वाढत असतानाच स्‍थानिक भागातील पुरवठा जेमतेम होत आहे. पाच ते सात क्विंटलपर्यंत लिंबे विक्रीसाठी येत असल्याचे खरेदीदार सांगत आहेत. हाच माल स्थानिक छोटे विक्रेते खरेदी करून बाजारांमध्ये विक्री करीत आहेत. पुरेशी लिंबे नसल्याने बाहेरचे व्यापारी आतापर्यंत खरेदीसाठी येथे आलेले नाहीत. किमान महिनाभरानंतर आवकेत बदल होईल अशी आशा आहे.

Lemon
Lemon Production : हस्त बहार लिंबू उत्पादन ठरते अधिक फायदेशीर

मागणीत वाढ
लग्नसराई तसेच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने लिंबाला मागणी वाढत आहे. खास करून विविध खाद्य उद्योग, रसवंती उद्योगात आणि घरगुती वापरकर्त्यांमध्येही लिंबाचा वापर वाढू लागला. परिणामी ठोक बाजार पाच हजारांवर पोहोचला. तर अनेक किरकोळ विक्रेत्यांनी देखील किमतीत वाढ केली आहे. किरकोळ लिंबूविक्री किलोला ८० रुपयांपर्यंत होत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणात बदल होऊन लिंबाच्या बागा यावेळेस फुटल्या नाहीत. प्रामुख्याने वाडेगाव भागात १६ ऑक्टोबरला पाऊस झाला होता. या पावसाचे दूरगामी परिणाम झाले. मागील दोन-तीन वर्षांत अशी संकटे सातत्याने वाढत चालली आहेत. लिंबाच्या बागा वेळेवर फुटण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. काही बागा वेळ निघून गेल्यानंतर जानेवारी फेब्रुवारीत सुद्धा फुटल्या. मात्र, हा माल आता यायला उशीर लागेल.
गणेश कंडारकर, लिंबू उत्पादक, वाडेगाव, जि. अकोला.

ठळक
-ऑक्टोबरच्या पावसाने बागांच्या बहर फुटण्यावर विपरीत परिणाम
-बाजारात मागणी वाढू लागली
- लिंबाची आवक तुलनेने कमीच
- हवामान बदलाचे लिंबू उत्पादकांना चटके

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com