Lemon Production : हस्त बहार लिंबू उत्पादन ठरते अधिक फायदेशीर

Lemon Crop : सिंचनासाठी पुरेसे पाणी असेल तरच योग्य जमिनीवर लिंबू फळबाग लागवड करावी. उन्हाळ्यात लिंबाना मागणी व अधिक भाव असतो.
Lemon Orchard Cultivation
Lemon Orchard CultivationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : सिंचनासाठी पुरेसे पाणी असेल तरच योग्य जमिनीवर लिंबू फळबाग लागवड करावी. उन्हाळ्यात लिंबाना मागणी व अधिक भाव असतो. हस्त बहार धरुन लिंबू उत्पादन घेणे अधिक फायदेशीर ठरते. उत्पादकता वाढविण्यासाठी फळबागेच्या काटेकोर व्यवस्थापनावर भर द्यावा लागेल. मुल्यवर्धनासाठी लिंबू प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीस चालना द्यावी लागेल, असा सूर लिंबू -उत्तम शेती पद्धतीबाबत प्रशिक्षणात तज्ज्ञ, मान्यवरांनी आळविला.

शुक्रवारी (ता. ३०) परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये सहकार व पणन विभाग,महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) अंतर्गंत पुणे येथील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग यांच्या हे तर्फे आयोजित करण्यात आले होते.

Lemon Orchard Cultivation
Lemon Orchard Cultivation : लिंबाला चांगला भाव मिळण्यासाठी असं नियोजन करा

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, आत्माचे प्रकल्प संचालक तथा प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, मॅग्नेटचे छत्रपती संभाजीनगर विभागीय प्रकल्प अधिकारी अरुण नादरे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, बदनापूर (जि. जालना) येथील डॉ. संजय पाटील, विशेषज्ञ डॉ. दीपक कच्छवे, डॉ. अनुप्रीता जोशी, उजळंबा (ता. परभणी ) येथील राजाभाऊ रगड, बाळासाहेब गाढवे, मॅग्नेटचे राहुल शेळके, मारोती पवार उपस्थित होते.

Lemon Orchard Cultivation
Lemon Orchard Farming : सतरा एकरांतील लिंबूबाग देतेय शाश्‍वत उत्पन्न

गावडे म्हणाले, की लिंबू उत्पादकता वाढ तसेच लिंबू प्रक्रिया उद्योग उभारणीस चालना देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. डॉ. पाटील म्हणाले, की बाजार पेठेतील मागणी, उपलब्ध पाणी यानुसार बहार व्यवस्थापन करुन लिंबू उत्पादन घ्यावे. फळझाडाचे आरोग्य जपत पाणी, खत, कीड, रोग व्यवस्थापनावर कटाक्षाने दिले तर उत्पादकता वाढते.

हस्त बहार धरण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात फळबागेस पाण्याचा ताण द्यावा. डॉ. कच्छवे यांनी कीड, रोग व्यवस्थापनावर तर डॉ. जोशी यांनी लिंबू प्रक्रिया उद्योगातील संधीबाबत माहिती दिली. लिंबू उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com