Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या

Drought Crisis : शासनाने सर्व योजनांना ब्रेक लावून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarAgrowon

Jalna News : शासनाने सर्व योजनांना ब्रेक लावून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना नवीन कर्ज मिळवून द्यावे. फळपिकांच्या नुकसानीचा मोबदला द्यावा.

शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे तसेच शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, अशा मागण्या आपण शासन दरबारी मांडणार आहोत, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (ता. ३०) दिली.

बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त म्हसला-भातखेडा येथील पाण्याअभावी वाळलेल्या मोसंबी, डाळिंब आणि सीताफळ पिकांच्या बागांची पाहणी करण्यासाठी श्री. वडेट्टीवार आले होते. नुकसानग्रस्त फळ बागायतदार शेतकरी प्रकाश भुजंग, अरुण गाडेकर, राधाकिसन गाडेकर, मधुकर गाडेकर, रामकृष्ण गाडेकर, दत्तात्रय गाडेकर आदी शेतकऱ्यांनी यंदा पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने फळपिकांना पाणी कमी पडले.

Vijay Wadettiwar
Drought : काँग्रेस करणार राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

त्यात वातावरणातील उष्णता वाढत चालल्याने सीताफळ, डाळिंब, मोसंबी पिके अक्षरशः वाळून त्याचा पाचोळा झाला. रामकृष्ण खेडेकर व दत्तात्रय गाडेकर यांनी आपले डाळिंबाचे पीक काढून बांधावर फेकले आहे. अद्याप नुकसानीचे अनुदान आणि विम्याचा परतावा देखील मिळालेला नाही.

कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून आपण शासनाला आम्हाला मदत देण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी केली. श्री. वड्डेट्टीवार म्हणाले, की शासनाने निवडणुकीच्या आचार संहितेत निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागून २५ हजार कोटी रुपयांच्या कामांचे टेंडर काढले. त्यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी परवानगी का मागितली नाही?

Vijay Wadettiwar
Maharashtra Drought : राज्यात ७५ टक्के कोरडा दुष्काळ; पाण्याच्या टँकरमध्ये सरकारचा भ्रष्टाचार ! काँग्रेसचा आरोप

यावेळी महाविकास आघाडीचे जालना लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. कल्याण काळे, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार संतोष सांबरे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बबलू चौधरी, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुभाषराव मगरे, कारभारी म्हसलेकर, परमेश्‍वर गोते, शेख अनवर अत्तार, शेख जावेद भगवान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

४९ हजार हेक्टरवरील मोसंबी पिके धोक्यात

मराठवाड्यात ४९ हजार हेक्टर उत्पादनक्षम मोसंबी बागा आहेत. ज्यांच्याकडे मुबलक पाण्याची व्यवस्था आहे, असे क्षेत्र वगळता बहुतांशी मोसंबी पिके दुष्काळाने गांजली आहेत. सध्या मोसंबी पिकांना पाणी देणे अवघड झाल्याने मोसंबी पिकांची फळगळ होत आहे. काही ठिकाणी मोसबीच्या बागा जळून त्याचे सरपण झाले आहे.

शासनाच्या वतीने मोसंबी जगविण्यासाठी तज्ज्ञांकडून मोसंबी बागतदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मात्र ज्या ठिकाणी मोसंबीसह डाळिंब, सीताफळ आदींच्या बागा उद्ध्वस्त झाल्या तिथे कोणती उपाययोजना करणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com