Swabhimani Shetkari Sanghatana Protest
Swabhimani Shetkari Sanghatana Protest Agrowon

Sugarcane Rate : मंत्री मुश्रीफांचा फोन तरी देखील राजू शेट्टी आंदोलनावर ठाम !

Sugarcane Farmer : ऊस दराच्या मुद्दावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली असून पालनमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टींना फोन केला.
Published on

Swabhimani Shetkari Sanghatana Protest : ऊस दराच्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरोली नाक्यावर आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळावर बसलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी फोन करून चर्चा केली. मात्र, शेट्टी हे दुसरा हप्ता देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

Swabhimani Shetkari Sanghatana Protest
Sugarcane Rate : महामार्गावर शेतकरी एकवटले, कोल्हापूरात आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न

गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला १०० रुपये दुसरा हप्ता जाहीर करावा. तसेच यंदाच्या हंगामात पहिली उचल साडे तीन हजार रुपये जाहीर करावी, या मागणीसाठी दीड महिन्यांपासून माजी खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे.

सरकार आणि साखर कारखान्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिरोली परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका घेतलेले कोल्हापूर पोलीस ठिकठिकाणी बॅरिकेड्स आणि चौक्या उभारून उभे आहेत.

या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. राजू शेट्टी यांनी स्वत: एक तासापासून ठिय्या मांडला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना फोन करून चर्चा केली. मात्र, चर्चेअंती तोडगा निघू न शकल्याने शेट्टी हे आपल्या मागण्यांवर ठाम आहे. साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या मागणी मान्य करत नाहीत. तोपर्यंत महामार्गावरून हटणार नाही. यामुळे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com