Innovative Teaching Methods: लक्ष्मीकांत ईडलवार: शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगशील शिक्षक!

Laxmikant Idalwar: लक्ष्मीकांत ईडलवार हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे शिक्षक असून, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक आकर्षक आणि प्रभावी करण्यासाठी विविध अभिनव प्रयोग यशस्वीपणे राबवले आहेत. त्यांच्या शिक्षणप्रेमी प्रवासाला ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक पुरस्कार’ मिळाल्याने त्यांच्या कार्याला अधिक मान्यता मिळाली आहे.
School
SchoolAgrowon
Published on
Updated on

डॉ. कैलास दौंड

Education For All: लक्ष्मीकांत एकनाथराव ईडलवार हे उपक्रमशील शिक्षक नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकडी ता. राहाता जि. अहिल्यानगर येथे बदली होऊन आलेले आहेत. या आधीच्या गोर्डेवस्ती, चांगदेव नगर आणि राहुरी तालुक्यातील रामपूर, जामखेड मधील नायगाव येथील शाळेत त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांमुळे त्यांचा सर्वत्र लौकिक आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची संधी उपलब्ध करण्यासाठी ईडलवार सरांनी फिरते बालवाचनालय सुरू केले. फिरते म्हणजे शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना आवडेल तिथे हे वाचनालय नेता येते. या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली.

नावीन्यपूर्ण उपक्रम

भूतदयेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संस्कार घडावा यासाठी त्यांनी ‘पक्ष्यांची खानावळ’ सुरू केली. पक्ष्यांसाठी ही मोफत होती. विद्यार्थ्यांनी पक्ष्यांना पिण्यासाठी शाळेच्या आवारात पाण्याची सोय केली, विद्यार्थी पक्ष्यांसाठी धान्यही आणत. सेल्फी विथ सक्सेस, एक कुटुंब एक कुंडी, PEE ACTIVITY, मी ज्ञानी होणार, कवींची भेट- नायगावहून थेट, सेल्फी पॉइंट, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, प्राचीन युद्धकला, लेजीम यांसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी शाळेत राबविले आहेत.

School
Rural Education: शेती अन् शिक्षणासाठी‘स्किल’ची मिळाली साथ

या उपक्रमांचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचा परिचय होण्यास मदत झाली. क्रीडा प्रकारांबद्दल आकर्षण निर्माण झाले. आपल्याला काहीतरी येत आहे, याचा आत्मविश्वास निर्माण झाला. या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासावर सुद्धा दिसून आला. विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये येणाऱ्या अडचणींना उपक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न लक्ष्मीकांत ईडलवार करतात. विद्यार्थ्यांचे मूलभूत संबोध स्पष्ट होण्यासाठी व अधिकच्या सरावासाठी विविध शैक्षणिक पीडीएफ आणि शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती देखील त्यांनी केली आहे.

आपल्या उपक्रमशीलतेचा शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील इतरही विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत. कोरोना कालावधीत SCERT पुणे यांच्या ‘शिकू आनंदे’ या उपक्रमात राज्यस्तरीय तज्ञ म्हणून काही घटकांचे सादरीकरण त्यांनी केले. ‘जीवन शिक्षण’ मासिकातून त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या शाळेतील विद्यार्थी संख्या चौऱ्याहत्तर असून ते इयत्ता पहिली व तिसरी वर्गाला सर्व विषय शिकवतात.

School
ZP School Education : विद्यार्थ्यांना पुस्तकांपासून वंचित ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार

पालकांचे सहकार्य

२०१९ मध्ये बदलीने लक्ष्मीकांत सरांना जामखेड तालुक्यातील नायगाव शाळा मिळाली. इथे बोलक्या भिंती करण्यासाठी लोकांनी जवळपास पस्तीस हजार रुपये जमा करून दिले. त्यातून शाळेचे बाह्यांग एकदम सुंदर झाले. त्याचबरोबर वाचनालयासाठी लागणाऱ्या खुर्च्या, चप्पल स्टॅन्ड ,पडदे, कुंड्या, रोपे, मुरूम अशा बऱ्याच गोष्टींसाठी पालक व ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी गावातील मर्दानी आखाडा चालवणाऱ्या पालकांच्या मदतीने लाठीकाठी, दांडपट्टा फिरवणे, तलवार व भाला चालवणे यांसारख्या प्राचीन, शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात ईडलवार सरांनी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हँडवॉश स्टेशन, रनिंग वॉटर, पाण्याची टाकी, साऊंड सिस्टीम, वॉटर फिल्टर शाळेला मिळाले.

एकूण सतरा वर्षांच्या सेवेमध्ये त्यांच्या नावीन्यपूर्ण कामांमुळे त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. शासनाच्या दीक्षा पोर्टलवर, एक भारत श्रेष्ठ भारत, समग्र शिक्षा यांसारख्या वेब पोर्टलवर त्यांचे शैक्षणिक व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून त्यांच्या शैक्षणिक लेखांना प्रसिद्धी मिळालेली आहे. राज्य स्तरावरील करूया मैत्री गणिताशी, इयत्ता चौथी कार्यपुस्तिकेच्या निर्मिती गटात आणि SCERT पुणे मार्फत सुरू असलेल्या आभासी वर्ग मध्ये राज्यतज्ञ म्हणून त्यांचा सहभाग आहे.

शिक्षकांसाठीच्या नवोपक्रम स्पर्धेतही जिल्ह्यातून राज्यस्तरासाठी त्यांची निवड झाली. शिक्षणाची वारी या विभागीय उपक्रमात शिक्षक राहुल लिमकर सरांसोबत स्टॉल मांडणी व सादरीकरण करत ईडलवार यांनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य च्या वतीने प्राथमिक विभागात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लक्ष्मीकांत ईडलवार यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक पुरस्काराने २०२२-२३ मध्ये गौरवण्यात आले.

(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)

(लक्ष्मीकांत ईडलवार ९९७५०३५०४६)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com