Onion Plantation : सरासरीच्या तुलनेत खरीप कांदा लागवडी निम्म्यावर

खरीप लाल कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याची दरवर्षी आघाडी असते. मात्र चालू वर्षी अतिवृष्टीमुळे सर्वत्र नियोजन कोलमडले आहे.
Khrif Onion
Khrif Onion Agrowon
Published on
Updated on

नाशिक : खरीप लाल कांदा उत्पादनात (Kharif Onion Production) नाशिक जिल्ह्याची दरवर्षी आघाडी असते. मात्र चालू वर्षी अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) सर्वत्र नियोजन कोलमडले आहे. त्याचा परिणाम सध्या दिसून येत असून, सरासरीच्या निम्म्या लागवडी (Onion Sowing) पूर्ण झाल्या आहेत. तर मागील वर्षाच्या तुलनेत या लागवडी जवळपास ६५ टक्क्यांनी घटल्याचे कृषी विभागाने (Department Of Agriculture) दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.

Khrif Onion
Onion Rate : नाफेड कांदा दराला आधार देईल का?

एकंदरीत हंगाम या वर्षी लांबणीवर गेला असून तो प्रभावित झाला आहे. त्यामुळे संभाव्य उत्पादनावरही त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे सध्याच्या परिस्थितीत समोर येत आहे. खरीप कांद्यासाठी जिल्ह्यातील चांदवड, येवला, नांदगाव, देवळा व मालेगाव हे तालुके नेहमी आघाडीवर असतात.

मात्र पावसामुळे हंगाम सध्या पिछाडीवर गेला आहे. चालू वर्षी अतिवृष्टी व संततधार पावसाच्या विळख्यात हंगाम सापडला आहे. जिल्ह्यात सर्वसाधारण २०,५८४ हेक्टर क्षेत्र आहे. मात्र चालू वर्षी त्या अवघ्या १०,९३३ हेक्टरवर पूर्ण झाल्या आहेत. तर मागील वर्षी याच लागवडी २९,३३८.५५ हेक्टरवर झालेल्या होत्या.

जुलै महिन्यात पावसाने आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नियोजन करून कांदा रोपवाटिका तयार केल्या. मात्र शास्त्रीय पद्धतीचा अवलंब न झाल्याने व अतिवृष्टीच्या तडाख्यात या रोपवाटिकांचे मोठे नुकसान झाले होते.

Khrif Onion
Onion Rate : मी कांदा बोलतोय...

त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत जवळपास दोन ते तीन महिने आठवडे या लागवडी पुढे गेल्या. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन प्रतिकूल परिस्थितीत लागवडी पूर्ण केल्या. मात्र सततच्या पावसामुळे या त्यांना मोठा फटका बसल्याची स्थिती आहे.

Khrif Onion
Onion Rate : कांद्याचे पैसे मिळाले नसल्याची शेतकऱ्याची तक्रार

येवला, चांदवड व मालेगांव तालुक्यात कांद्याच्या लागवडीत लक्षणीय घट दिसून आली आहे. नांदगाव तालुक्यात चालू वर्षी लागवडी वाढल्याचे दिसून आले. मात्र अतिवृष्टीच्या तडाख्यात लागवडी वाहून गेल्याने वाढूनही त्यात काहीही अर्थ नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दसरा सणापासून काढणीसाठी सुरू होणारा लाल कांद्याचा हंगाम यंदा शक्य होणार नाही, अशी एकंदर स्थिती आहे.

हंगामातील अडचण ठरलेले महत्त्वाचे मुद्दे

- सततच्या पावसामुळे रोपवाटिका तयार करणे ठरले अडचणीचे

- टाकलेल्या रोपवाटिका ४० ते ४५ टक्के खराब

- रोपांची उपलब्धता न झाल्याने लागवडी विस्कळीत

- दुबार रोपवाटिका तयार केल्याने हंगाम २ ते ३ आठवडे लांबणीवर

- लागवडी पूर्ण करताना शेतकऱ्यांची तारांबळ

- खाली झाले, त्यामुळे लागवडीसाठी मशागत करण्यास अडथळे

- लागवडी काही ठिकाणी पूर्ण; मात्र अतिवृष्टीमुळे लागवडी वाहिल्या.

जिल्ह्यातील रोपवाटिका व लागवड स्थिती अशी : (क्षेत्र हेक्टर)

तालुका...सर्वसाधारण क्षेत्र...२०२१ लागवड...२०२२ मधील चालू लागवड (हेक्टर)...गतवर्षीच्या तुलनेत घट

मालेगाव...२,४३०...३,८९०...२,५४५...१३४५

सटाणा...१,२००...२,६५०...१५०...२५००

नांदगाव...५४०...१,९७८...२६५०... ६७२ वाढ

कळवण...३७५...२२६...०...२२६

देवळा...१,५१५...१,५७४...७७९.५०....७९४.४०

निफाड...४५०... १८०.५५...०...१८०.५५

सिन्नर..५१८...३२५...२०...३०५

येवला...८,३००...८,३२७...६६९...७,६५८

चांदवड...४,८६०...९,१८८...४,१२०...५,०६८

एकूण...२९,३३८.५५...१०,९३३...

रोप जगविणे खूप अवघड झाले आहे. सप्टेंबर महिन्यात कांदा रोपांसाठी पाहिजे तसे वातावरण नाही. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये साचल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढता आहे. यामुळे परिसरात कांदा रोपे, कीटकनाशके व खतांचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. यंदाच्या खरीप हंगामात लाल कांदा पीक घेणं शेतकऱ्यांसाठी मोठं संकटच म्हणावं लागेल.
मंगेश कातकाडे, कांदा उत्पादक, नायगाव, ता. सिन्नर
चालू वर्षी खरीप लाल कांद्याची लागवड उशिराने आहे. त्यामुळे कांदा लागवड कमी प्रमाणात होईल. सध्याच्या वातावरणाच्या परिस्थितीमुळे रोपे उशिराने टाकली गेली. त्याचा लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे.
दादाभाऊ दाभाडे, कांदा उत्पादक, माणिकपुंज, ता. नांदगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com