Soybean Procurement Deadline: सोयाबीन खरेदीला उरले दोन दिवस

Soybean Market : जालना जिल्ह्यात तीन लाख ४४ हजार ३३५ क्विंटल तर बीड जिल्ह्यात तीन लाख १४ हजार ४९२ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.
Soybean Market
Soybean ProcurementAgrowon
Published on
Updated on

Jalana News : आधारभूत किमतीने सुरू असलेल्या सोयाबीन खरेदीला ३१ तारीख लक्षात घेता केवळ दोन दिवस उरले आहेत. जालना जिल्ह्यात तीन लाख ४४ हजार ३३५ क्विंटल तर बीड जिल्ह्यात तीन लाख १४ हजार ४९२ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. त्यातच दोन्ही जिल्ह्यात हजारों शेतकऱ्यांना एसएमएस पाठवून खरेदीसाठी बोलावणे बाकी असल्याने विहित मुदतीत सोयाबीन खरेदी उद्दिष्टानुसार पूर्ण होईल का हा खरा प्रश्न आहे.

या संदर्भात अधिक माहितीनुसार, की जालना जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुमारे १५ केंद्रावरून सोयाबीनची आधारभूत किमतीने खरेदी सुरू झाली. १५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या खरेदीसाठी जिल्ह्यातील १५ केंद्रावरून सुमारे २८ हजार ९७१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.

Soybean Market
Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी; नोंदणी करूनही शेतकऱ्यांची कोंडी

आधी १ लाख ६९ हजार क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट असलेल्या जिल्ह्यात आणखी दोन लाख क्विंटल सोयाबीन खरेदीच उद्दिष्ट वाढविण्यात आले होत. दुसरीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २५ हजार ५९९ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस आजवर पाठविण्यात आले तर ३३७२ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविणे बाकी होते.

एसएमएस पाठवलेल्या शेतकऱ्यांपैकी २४ हजार ४३ शेतकऱ्यांकडून ३ लाख ४४ हजार ३३५ क्विंटल ४६ किलो सोयाबीनची ४८९२ रुपये प्रतिक्विंटल या आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. म्हणजे अजूनही एसएमएस पाठवलेल्या शेतकऱ्यांपैकी सोयाबीन खरेदी बाकी होती.

Soybean Market
Soybean Procurement Center: सोयाबीन खरेदी केंद्रांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

तर हजारो शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठी एसएमएस पाठविणे बाकी होते. खरेदी केलेल्या सोयाबीन पैकी २ लाख ३ हजार २२ क्विंटल २१ किलो सोयाबीन वेअर हाऊसमध्ये पाठविण्यात आले.तर १ लाख ४१ हजार ३१३ क्विंटल २५ किलो सोयाबीन वेअर हाऊस मध्ये पाठविणे बाकी होते.

बीडमध्ये ३ लाख १४ हजार क्विंटल खरेदी

बीड जिल्ह्यात सुमारे ३० केंद्रावरून सोयाबीनचे आधारभूत किमतीने खरेदी सुरू करण्यात आली. या खरेदीसाठी जिल्हाभरातील ४४,७४४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २९ जानेवारी अखेरपर्यंत २८ हजार ४६५ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठवण्यात आले. एसएमएस पाठवलेल्या शेतकऱ्यांपैकी ११७०३ शेतकऱ्यांकडून ३ लाख १४ हजार ४९२ क्विंटल १९ किलो सोयाबीनची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. खरेदीसाठी केवळ दोन दिवस उरले असल्याने विहित मुदतीत खरेदी होईल का हा प्रश्न आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com