Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी; नोंदणी करूनही शेतकऱ्यांची कोंडी

Soybean MSP Procurement : श्रीरामपुर येथील केसापुर, टाकळीभान, श्रीरामपुर, पुणतांबा, खोपडी, पिंपळस आणि राहता या सात खरेदी केंद्रावरील सोयाबीन श्रीरामपुर वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलं जातं. परंतु वखारची महामंडळ भरल्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेलं सोयाबीन वाहनातून उतरवून घेतलं जात नाही, त्यामुळे खरेदी केंद्रासमोर तीन ते चार दिवसांपासून वाहन अडकून बसली आहेत.
Soybean Procurement
Soybean Procurement Agrowon
Published on
Updated on

Soybean Farmers: सोयाबीन खरेदीतील गोंधळ अद्यापही सुरूच आहे. त्याचा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे. श्रीरामपुरमधील सोयाबीन खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस मुक्काम करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नोंदणी करूनही सोयाबीन खरेदी करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.

श्रीरामपुर येथील केसापुर, टाकळीभान, श्रीरामपुर, पुणतांबा, खोपडी, पिंपळस आणि राहता या सात खरेदी केंद्रावरील सोयाबीन श्रीरामपुर वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलं जातं. परंतु वखारची महामंडळ भरल्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेलं सोयाबीन वाहनातून उतरवून घेतलं जात नाही, त्यामुळे खरेदी केंद्रासमोर तीन ते चार दिवसांपासून वाहन अडकून बसली आहेत. तसेच सोयाबीन खरेदीला दोन दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रासमोर रांगा लावल्या आहेत. नोंदणी करूनही सोयाबीनसाठी रांगा लावून बसावं लागत असल्याने खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Soybean Procurement
Kolhapur Farmers : वाघ, टस्कर, बिबट्या, गव्यांचा धुमाकूळ, कोल्हापुरातील शेतकरी हैराण, वनविभागाची बघ्याची भूमिका

वखार महामंडळाकडे ते ९ हजार २०० टन सोयाबीनची आवक झाली. दररोज किमान ४० ते ४५ वाहनं खरेदी केंद्रावर विक्रीसाठी येत आहेत. वखार महामंडळ गोदाम भरल्यामुळे बाजार समितीचं घेतलेलं गोदामही भरलं आहे. तसेच एमआयडीसीचे भाडेतत्वावर घेतलेली चार गोदामही भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन गोदामांचा शोध घेतला जात आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर ताटकळत उभं राहावं लागत आहे, असं शेतकरी सांगतात.

सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारी २०२५ रोजी संपणार आहे. यापूर्वी १२ जानेवारी अंतिम मुदत होती. परंतु सरकारने खरेदीला मुदत वाढ दिली होती. आता दोन दिवसांत मुदत संपणार आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करता यावी, यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर खरेदीला मुदतवाढ दिली जाणार आहे. तोवर शेतकऱ्यांची मात्र कोंडी होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com