Crop Insurance : धुळे जिल्ह्यातील शेतकरी पीकविम्यासाठी सरसावले

Crop Insurance : यंदा धुळे जिल्ह्यात दोन लाख ३३ हजार २६५ हेक्टर क्षेत्रासाठी दोन लाख ४१ हजार २०७ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Dhule News : शेतकऱ्यांचा पीकविम्याचा हिस्सा शासन भरत असल्याने आता एक रुपयात पीकविमा काढला जात आहे. खरिपातील पिकांना विम्याचे कवच घेण्याकडे यंदा धुळे जिल्ह्यात शेतकरी बऱ्यापैकी सरसावले असून, चक्क ९०९टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.

तथापि, उर्वरित शेतकऱ्यांनी पीकविमा न काढण्याची अनेक कारणे असल्याचे समोर आली आहेत. त्यात आधारकार्ड, बँक खाते अपडेट नसणे, मृत खातेदार, स्थलांतरित खातेदार वा इतर तत्सम कारणांमुळे दहा टक्के शेतकरी सहभागी होऊ शकले नाहीत.

जिल्ह्यात जवळपास पावणे तीन लाख खातेदार आहेत. यंदा धुळे जिल्ह्यात दोन लाख ३३ हजार २६५ हेक्टर क्षेत्रासाठी दोन लाख ४१ हजार २०७ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. राज्य शासनाचे पाठबळ, कृषी विभागाच्या शासकीय यंत्रणेच्या अथक प्रयत्नातून जिल्ह्यात नव्वद टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे.

Crop Insurance
Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेतील कर्जदार शेतकऱ्यांचा टक्का वाढेना

पीकविम्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा ७६ कोटी ९१ लाख २५ हजार असून, केंद्र शासनाचा हिस्सा २७ कोटी ७९ लाख ४९ हजार रुपये आहे. १०४ कोटी ७० लाख ७४ हजार रुपये एकूण विमा रक्कम असून, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत शंभर टक्के नुकसान झाल्यास एक हजार १०८ कोटी ८५ लाख ३ हजार रुपये रक्कम भरपाई मिळू शकते.

Crop Insurance
Banana Crop Insurance : निधीअभावी केळी विमा परताव्यांना विलंब होण्याची शक्यता

पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना लागू केली आहे.

खरिपासाठी जिल्ह्यात भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, नाचणी, भुईमूग, तीळ, कारले, कांदा या चौदा पिकांना विमाकवच मिळते. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के आहे. धुळे जिल्ह्यात तीन वर्षासाठी (२००३ ते २०२५-२६) एचडीएफसी इग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीची निवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com