Land slide Risk: खोपोलीत दरडी कोसळण्याची भीती

Monsoon Threat: या भागात अनेक रहिवाशात दरड कोसळण्याची भीती कायम आहे, मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.
Land slide Risk
Land slide RiskAgrowon
Published on
Updated on

Khopoli News: या भागात अनेक रहिवाशात दरड कोसळण्याची भीती कायम आहे, मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. विशेष म्‍हणजे तीन हजार नागरिक जीवन-मृत्यूच्या सीमारेषेत असल्याचे बोलले जात आहे.

खोपोलीतील दरडग्रस्त रहिवासी भागाचे संरक्षण होण्यासाठी व योग्य कार्यवाही होण्यासाठी स्थानिक नागरिक, माजी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. स्थानिक आमदारांनी विधानसभा अधिवेशनात चर्चा घडवून आणली आहे, मात्र अद्यापही कायमस्वरूपी ठोस उपाययोजना मात्र झालेल्या नाहीत.

Land slide Risk
Land Slide : दरडग्रस्‍त गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा

नगरपालिका क्षेत्रातील काजूवाडी, सुभाषनगर व यशवंतनगरचा काही भाग दरडप्रवण, राहण्यास धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तिन्ही वस्तीत जवळपास ६५० ते ७०० रहिवासी घरे असून, साधारण ३००० च्या आसपास लोकवस्ती आहे.

Land slide Risk
Land Slides Update : महाडमधील ७२ गावांना दरडींचा धोका

मागील वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पहिल्या पावसात येथील वर्धमान नगर परिसरातील कमला या रहिवासी संकुलात मोठी दरड तसेच मोठ मोठे दगड कोसळले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नव्‍हती. याचदरम्यान मोगलवाडी भागात डोंगरावरील माती व दगड येथील घरांवर कोसळण्याची घटना घडली होती.

यात आर्थिक नुकसान झाले, मात्र सुदैवाने जीवितहानी मात्र टळली होती. मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात माती व दगड रहिवासी भागात कोसळण्याच्या घटना येथे नित्याच्या झाल्या आहेत. याही वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे काजूवाडी डोंगराचा मोठा भाग खचला होता, शिवाय माती आणि दगड रस्त्यावर आल्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर तहसीलदार अभय चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी या रहिवासी भागाची पाहणी करून काही उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, असे सांगितले आहे.खोपोलीतील दरड प्रवण क्षेत्राचे सहा वर्षांपूर्वी भूगर्भ सर्वेक्षण व तांत्रिक विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यांच्या अहवालानुसार काजूवाडी, सुभाषनगर, यशवंतनगर, वर्धमाननगर, सहकारनगर आदी रहिवासी भागाला दरडीचा धोका वर्तवण्यात आला आहे.

विशेष मॉक ड्रिलचे आयोजन

मे महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे काजूवाडी येथील मोठा भाग खचून माती व दगड खाली रस्त्यावर आल्याने प्रशासन जागे झाले होते. या पार्श्वभूमीवर सुभाषनगर या दरडग्रस्त भागातील रहिवाशांना आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी विशेष मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. या मॉक ड्रिलमध्ये तालुक्यातील सर्वच विभागांनी सहभागी होऊन आपत्कालीन स्थितीबाबत सराव व प्रशिक्षण घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com