Landslide : दरडग्रस्त भागात उपाययोजना करा

MLA Atul Benke : डोंगराच्या जवळपास असल्याने या लोकवस्त्यांचे स्थलांतर, पुनर्वसन व लोक उपयोगी उपयोजना होण्यासाठी शासन स्तरावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली.
Mahad LandSlide
Mahad LandSlideAgrowon
Published on
Updated on

Junnar News : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खामगाव (मांगणेवाडी), निमगिरी (तळमाची वाडी) भिवाडे खुर्द, उंडेखडक, कोटमवाडी, तळेरान आदी भागात भूस्खलन झाले आहेत.

डोंगराच्या जवळपास असल्याने या लोकवस्त्यांचे स्थलांतर, पुनर्वसन व लोक उपयोगी उपयोजना होण्यासाठी शासन स्तरावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली.

आमदार अतुल बेनके यांनी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाचे जवळपास दोन महिने होत आले आहेत. या काळात पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या मोठ्या घटना घडल्या आहेत.

Mahad LandSlide
Landslide Crisis : कळवणमध्ये ३० ठिकाणी भूस्खलनाचा धोका

तालुक्यातील कोटमवाडी (शेळके वस्ती), उंडेखडक (रावते वस्ती), तळेरान (कळमदरी) आदी लोकवस्ती यांना अतिदृष्टी पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. डोंगर भागाचा धोका या लोकवस्त्यांना मोठ्या प्रमाणावर दरवर्षी होत आहे.

पाऊस सुरू झाला की या लोकवस्तीमधील लोक जीव मुठीत धरून जीवन जगत असतात. त्यादृष्टीने या नागरिकांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. तर काही ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे.

Mahad LandSlide
Matheran Landslide : भूस्खलनामुळे पर्यटकांना बंदी

बेनके यांनी म्हटले आहे, की निमगिरी (तळमाची वाडी), खामगाव (मांगणेवाडी), भिवाडे खुर्द आधी परिसरात डोंगराच्या भागाला अतिवृष्टी पावसाने मोठमोठ्या भेगा पडत आहेत व त्यातून झिरपणारे पाणी यामुळे भूस्खलन स्थिती निर्माण झाली आहे.

डोंगराच्या जवळपास लोकवस्ती असल्याने नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिक व पदाधिकारी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही आज अखेर यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.

जुन्नर तालुक्यातील खामगाव (मांगणेवाडी), निमगिरी (तळमाची वाडी), भिवाडे खुर्द, तळेरान (कळमदरी), उंडेखडक (रावते वस्ती), कोटमवाडी (शेळके वस्ती) या लोक वस्त्या आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने वारंवार डोंगराचा काही भाग वाहून खाली रस्त्यावर येत आहे. अनेक ठिकाणी लोक वस्तीकडे जाणारे रस्ते अतिवृष्टी पावसाने खराब झालेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com