Land Slide : दरडग्रस्‍त गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा

Land Slide Affected Rehabilitation : भारतीय भूवैज्ञानिक विभागाने केलेल्‍या पाहणीत, जिल्ह्यातील गावे १०३ दरडप्रवण असल्‍याचा नोंद केली आहे. यातील २० गावे संवेदनशील तर ११ अति अतिसंवेदनशील असल्‍याचे नमूद केले आहे.
Anil Patil and Aditi Tatkare
Anil Patil and Aditi TatkareAgrowon
Published on
Updated on

Alibaug News : भारतीय भूवैज्ञानिक विभागाने केलेल्‍या पाहणीत, जिल्ह्यातील गावे १०३ दरडप्रवण असल्‍याचा नोंद केली आहे. यातील २० गावे संवेदनशील तर ११ अति अतिसंवेदनशील असल्‍याचे नमूद केले आहे. या संवेदनशील गावांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या आहेत.

Anil Patil and Aditi Tatkare
Milk Rate : : दूध दरासाठी रयत क्रांती संघटना आक्रमक ; विखे-पाटलांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

मंत्रालयात आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी, रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाबाबत प्रश्‍न मांडले. या वेळी मौजे मेढा, शिंगरकोंड (मोरेवाडी), तिसे या गावाचे पुनर्वसन तसेच दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रस्ताव मागवून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्‍या. बैठकीला आमदार अनिकेत तटकरे, उपसरपंच वरसगाव राकेश शिंदे, पुनवर्सन विभागाचे अधिकारी, तिसे गावाचे उपसरपंच राजेश कदम आदी उपस्थित होते.

Anil Patil and Aditi Tatkare
Crop Insurance : नांदेड जिल्ह्यात ३११ कोटींचा पीकविमा अग्रिम मंजूर

जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे, त्‍यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. प्राधान्याने हा विषय मार्गी लावला जाईल. त्याचबरोबर म्हसळा तालुक्यातील लिपनी वावे व महम्मद खनीखार या गावाच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

६१ आदिवासीवाड्या धोकादायक

जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण क्षेत्रामध्ये आहेत. यातील वीस गावातील नागरिकांना भविष्यात दरडीचा सामना करावा लागेल, असा अहवाल भूवैज्ञानिकांनी दिला तर उर्वरित ८३ गावांची पाहणी सुरू असल्याचे रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रातील गावांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे पाच तालुक्यातील ६१ आदिवासी वाड्या धोकादायक स्थितीत असल्याने त्यांच्याही पुनर्वसनाची मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com