Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठीचे मोजणी व सर्व्हेक्षण स्थगित करा

Land Survey For Highway Project : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, सरकारने आश्वासन पाळले नाही.
Land Survey
Land SurveyAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी व सर्व्हेक्षण बुधवारपासून (ता. २५) सुरू होणार आहे. चार तालुक्यांतील १९ गावांत मोजणी आणि सर्व्हेक्षणचे काम २५ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे. शक्तिपीठाबाबत दिलेले आश्वासन पाळून मोजणी व सर्व्हेक्षण स्थगित करावे, अन्यथा संघर्ष करू इशारा बचाव कृती समितीने दिला आहे.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, सरकारने आश्वासन पाळले नाही. दरम्यान, शक्तिपीठ महामार्गासाठी प्रशासनाने संवाद साधण्यासाठी संवाद कार्यक्रम जाहीर केला होता. हा संवाद कार्यक्रमासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पळवून लावले होते.

Land Survey
Shaktipeeth Highway: पवनार ते कोल्हापूर पर्यंतच्या ‘शक्तिपीठ’वर शिक्कामोर्तब

दरम्यान, जमिनीच्या मोजणी आणि सर्व्हेक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज या चार तालुक्यांतील १९ गावांत टप्प्या-टप्प्याने मोजणी आणि सर्व्हेक्षण होणार आहे.

ही प्रक्रिया सुमारे एक महिना चालणार आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजनही केले आहे. शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलिस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Land Survey
Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ला बार्शी तालुक्यातही विरोध

सरकार जबरदस्तीने मोजणी करण्याचा घाट घालत आहे. शेतकरी हा घाट हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. शक्तिपीठ मुळे शेतकऱ्यांचे, शेतीसह पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे.

याची कल्पना सरकारला वारंवार दिली आहे. परंतु मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार त्याकडे दुलर्क्ष करत आहे. सरकारने शक्तिपीठ महामार्गासाठी बुधवार (ता. २५ जून) पासून सुरु होणारी मोजणी स्थगित करावी अन्यथा संघर्ष अटळ आहे, अशा इशारा शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, प्रवीण पाटील, सुनील पवार, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील, विष्णू पाटील यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com