Farmers Protest : नोकऱ्या नाहीत तर मत नाही!; कर्नाटकातील चामराजनगर शेतकऱ्यांची भूमिका

Karnataka Farmers Protest : कर्नाटकातील वरुणातील अलगांची गावात साखर कारखान्यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. तसेच स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण ते अद्यापही पूर्ण न झाल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कर्नाटकातील जमीन गमावलेल्या लोकांनी दिला आहे.
Farmers Protest
Farmers ProtestAgrowon

Pune News : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक राज्यात प्रचाराचा जोर वाढला आहे. यादरम्यान शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या विरोधी भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र तथा माजी आमदार आणि काँग्रेस नेते डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. तसेच उपस्थित ग्रामस्थांनी यतींद्र यांच्यावर संधीसाधूपणाचे आरोप करताना लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. हा प्रकार चामराजनगर लोकसभा मतदार संघातील बन्नरी अम्मान साखर कारखान्यासाठी केलेल्या जमीन अधिग्रहनावरून घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, यतींद्र हे चामराजनगरचे उमेदवार सुनील बोस यांच्या प्रचारासाठी नांजनगुडू तालुक्यातील मल्लुपुरा येथे गेले होते. येथील ग्रामपंचायतीमध्ये यतींद्र पोहचले असता त्यांना ग्रामस्थांनी घेराव घालत कारखान्याच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच नोकऱ्यांच्या आश्वासनाचे काय म्हणत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला.

Farmers Protest
Farmers Protest : ७ एप्रिलला देशभरात शेतकऱ्यांचा मोर्चा; तर शंभू सीमेवर रेल्वे ट्रॅक रोखण्याची घोषणा

म्हैसूर जिल्ह्यातील अलगांची गावात कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाकडून (KIADB) शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करण्यात आले होते. त्यानंतर बन्नरी अम्मान साखर कारखान्याला दिल्या. यावेळी सरकार आणि कारखान्याने कारखान्यात स्थानिक तरूणांना नोकरीची हमी दिली होती. मात्र ती अद्यापही पूर्ण झाली नाही.

यावरून तीन गावातील शेकडो शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर सरकारला घेरण्याचे ठरवले. याप्रमाणे शेतकऱ्यांनी यतींद्र यांच्यावर आपला संताप काढला. शेतकऱ्यांनी यतींद्र यांच्यावर संधीसाधूपणाचा आरोप करताना, ते आता निवडणूक आली म्हणून येथे आले आहेत. नाहीतर तर ते इकडे आलेही नसते, असा आरोप केला आहे. कारखान्याच्या प्रश्नात हस्तक्षेपाचे आश्वासन देणाऱ्या यतींद्र यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रश्न का नाही सोडवला? असा सवाल देखील केला आहे. राज्य सरकार गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही. तर आश्वासन देणारा कारखानाही अजिबात ऐकत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Farmers Protest
Delhi Farmers Protest : दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूचं ; शेतकऱ्यांचा विरोध कायम

यावरून शेतकरी व स्थानिक नागरिकांनी यतींद्र यांच्या माध्यमातून सरकारला कडक इशारा दिला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तिन्ही गावातील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा दिला आहे. यावेळी शेतकरी व स्थानिकांचा रोष पाहताना पुढील संघर्ष टाळण्यासाठी यतिंद्र सिद्धरामय्या यांनी तेथून काढता पाय घेतला.

किती जनांच्या गेल्या जमिनी

कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाने (KIADB) १९९० मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. यात येथील २२० हून अधिक कुटूंबांच्या शेतजमिनी गेल्या. यावेळी कारखाना व्यवस्थापनाने तरूणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ४४ जणांनी नोकरीसाठी अर्ज सादर करूनही एकाला देखील नोकरी दिली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

कारखान्याच्या व्यवस्थापनाने म्हणणे

यादरम्यान कारखाना व्यवस्थापनाने देखील शेतजमिनी संपादित करताना जे आश्वासन दिले ते पाळल्याचे म्हटले आहे. तसेच ७० जणांना नोकरी दिल्याचा दावा केला आहे. तसेच सद्यस्थिती येथे एकही जागा रिक्त नसल्याचा दावा व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com