Farmers Protest : ७ एप्रिलला देशभरात शेतकऱ्यांचा मोर्चा; तर शंभू सीमेवर रेल्वे ट्रॅक रोखण्याची घोषणा

Delhi Farmers Protest : दिल्ली जवळच्या शंभू सीमा, खनौरी, डबवली आणि रतनपुरा सीमेवर हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत. तर आता आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यासह रोखण्याची घोषणा केली आहे. 
Agrowon
Delhi Farmers' ProtestDelhi Farmers' Protest
Published on
Updated on

Pune News : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारला इशारा दिला आहे. तसेच आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅक रोखण्यासह मोर्चा काढण्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली आहे. ७ एप्रिलला देशभर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून भाजपच्या पुतळ्याचे दहन करण्यात येईल. तसेच ९ एप्रिलला शंभू सीमेवर रेल्वे ट्रॅक रोखला जाईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी किसान भवन, चंदीगड येथे पत्रकार परिषदेत बुधवारी (ता. ०३) दिला. यावेळी जगजीतसिंग डल्लेवाल, श्रवणसिंह पंढेर, लखविंद्रसिंग औलख, अमरजीतसिंह मोहडी यांच्यासह इतर शेतकरी नेते उपस्थित होते. 

हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत. आंदोलक शेतकरी दिल्लीच्या जवळ असणाऱ्या शंभू, खनौरी, डबवली आणि रतनपुरा सीमेवर आंदोलन करत असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले आहे. तर जोपर्यंत मागण्यांवर तोडगा निघत नाही. तोपर्यंत मागे न हटण्याची भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. 

Agrowon
Farmers Protest in Delhi : शुभकरन सिंग मृत्यू प्रकरण : उच्च न्यालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

यादरम्यान आता पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांवरून आक्रमक पवित्रा घेताना ७ एप्रिल रोजी देशभर मोर्चांचे आयोजन आणि ९ एप्रिल रोजी शंभू सीमेवर रेल्वे ट्रॅक रोखण्याचा इशारा दिला आहे. तसेच ७ एप्रिल रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात भाजपच्या पुतळ्याचे दहन करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. तसेच केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे ३ ते ११ एप्रिल या कालावधीत मृत आंदोलक शेतकरी शुभकरन सिंह यांच्यासाठी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येतील, असेही शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे. 

अलीकडेच पंजाब सरकारने राज्यातील अनेक बाजार समित्या बंद केल्या आहेत. तर गव्हाचे पिकाची याच मंडईत साठवणूक केली आहे. सरकराचे हे धोरण दारामागून ३ काळ्या कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासारखे असल्याची टीका देखील शेतकरी नेत्यांनी केली आहे. तसेच शंभू बॉर्डर, खनौरी, डबवली, रतनपुरा सीमेवर आपल्या मागण्यांसाठी हजारो शेतकरी आंदोलन करत असून १० फेब्रुवारीपासून हरियाणात शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी रविंद्र सिंह, अमरजीत सिंह, अनीश खटकड, नवदीप सिंह आणि गुरकीरत सिंह हे ५ शेकतरी नेते आजही तुरुंगात आहेत. 

Agrowon
Farmers Protest : भाजपला पंजाब शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; नेत्यांना गावबंदी

तर फक्त शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी शंभू बॉर्डर, खनौरी, डबवली, रतनपुरा सीमेवरील वीज जाणीवपूर्वक खंडित करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तर यावेळी संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा राज्यातील बाजार समित्या वाचवणे, शेकतरी नेत्यांची सुटकेसह सीमेवरील खंडीत वीज पुरवठा सुरळीत सुरू व्हावा यासाठी ७ एप्रिलला देशभरात जिल्हास्तरीय मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तर या मोर्चात भाजपचा पुतळा जाळण्याचाही इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. 

तसेच जर सरकारने शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास ९ एप्रिलला शंभू सीमेवर रेल्वे ट्रॅक रोखून धरू असे देखील शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे. तर यानंतरही जर सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून जाग नाही आली तर येणाऱ्या काळात रेल्वे ट्रॅक अनेक जिल्ह्यांमध्ये आडवले जाईल असेही शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com