Animal Vaccination : सांगली जिल्ह्यात लाळ्या खुरकूतचे लशीकरण लवकरच सुरू होणार

Animal Husbandry Department : कोल्हापुर जिल्ह्यातील जनावरांना लाळ्या खुरकूतच्या लशींचा तुटवडा असल्याने डिसेंबर महिना संपला तरी पशुसंवर्धन विभागाने लशीकरण सुरू केले नव्हते.
 Vaccination Of Animals
Vaccination Of AnimalsAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातील जनावरांना लाळ्या खुरकूतच्या लशींचा तुटवडा असल्याने डिसेंबर महिना संपला तरी पशुसंवर्धन विभागाने लशीकरण सुरू केले नव्हते. पशुसंवर्धन विभागाने राज्य शासनानकडे ६ लाख ९५ हजार ९०० लशी मागितल्या होत्या. या लशी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. लवकरच जनावरांना लाळ्या खुरकूतीचे लशीकरण करण्याची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

जिल्ह्यात गायींची संख्या ३ लाख २४ हजार ७५६, तर म्हशींची ४ लाख ९३ हजार ९९८ अशी एकूण ८ लाख १८ हजार ७५४ जनावरांची संख्या आहे. दर वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर लाळ्या खुरकूत या रोगाची लागण जनावरांना लशीकरण केले जाते. मात्र, जिल्ह्यात ४० हजार लाळ्या खुरकूतच्या लशी शिल्लक होत्या. साखर कारखाने सुरू झाले आहेत.

 Vaccination Of Animals
Animal Vaccination : सांगली जिल्ह्यात १२ हजार पशूंना लाळ खुरकत लसीकरण

याठिकाणी ऊसतोडणी मजुरांकडेही जनावरे असतात. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने कारखाना आणि जिल्ह्याच्या सीमेवरील १२ हजार जनावरांना लशीकरण केले. परंतु पुरेसा लशींचा साठा नसल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे ६ लाख ९५ हजार ९०० लशींची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे ६ लाख ९५ हजार डोस उपलब्ध झाले आहेत.

 Vaccination Of Animals
Animal Vaccination : रायगडमध्ये पशुसंवर्धनकडून ७० हजार जनावरांचे लसीकरण

जिल्ह्यात लाळ्या खुरकूतीचे डोस उपलब्ध असून लशींचा साठा मुबलक आला आहे. सुरुवातीला कारखाना परिसरात राहिलेल्या जनावरांना लशीकरण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून तालुक्यातील प्रत्येक गावात लशीकरणाची मोहीम लवकर सुरू केले जाईल.

जिल्ह्यातील जनावरांना लशीकरण करण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. प्रत्येक तालुक्याच्या मागणीनुसार तालुक्याला लशी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरच लशीकरण पूर्ण केले जाईल.

‘लाळ्या खुरकत’चे ६ लाख डोस आले आहेत. प्रत्येक तालुक्याला लाळ्या खुरकूतचे डोस दिले जातील. त्यानंतर जनावरांना लवकरच लशीकरण सुरू करून ते पूर्ण केले जाईल.
डॉ. अजय थोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, मिरज (सांगली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com