Animal Vaccination : सांगली जिल्ह्यात १२ हजार पशूंना लाळ खुरकत लसीकरण

Animal Husbandry Department : सांगली जिल्ह्यातील जनावरांना लाळ खुरकतच्या लसींचा तुटवडा असल्याने डिसेंबर महिना संपला तरी पशूसंवर्धन विभागाने लसीकरण सुरु केले नसल्याचे चित्र आहे.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जनावरांना लाळ खुरकतच्या लसींचा तुटवडा असल्याने डिसेंबर महिना संपला तरी पशूसंवर्धन विभागाने लसीकरण सुरु केले नसल्याचे चित्र आहे. सध्या ४० हजार लाळ खुरकतच्या लसी उपलब्ध असल्याने कारखाना आणि जिल्ह्याच्या सीमेवरील १२ हजार पशुधनाला लसीकरण केले आहे. मात्र, ८ लाख ६ हजार ७५४ जनावरांना लसीकरण झाले नसल्याने जिल्ह्यातील पशुपालकांना डिसेंबरमध्ये येणाऱ्या ‘लाळ्या खुरकत’ रोगाची धास्ती लागली आहे.

जिल्ह्यात गायींची संख्या ३ लाख २४ हजार ७५६ तर म्हैशींची ४ लाख ९३ हजार ९९८ अशी एकूण ८ लाख १८ हजार ७५४ जनावरांची संख्या आहे. दरवर्षी प्रतिवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान (एफ. एम. डी.) तोंडखुरी पायखुरी/ लाळ्या खुरकत या रोगाची लागण जनावरांना होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून या रोगाचे लसीकरण केले जाते. मात्र, जिल्ह्यात ४० हजार लाळ खुरकतच्या लसी शिल्लक होत्या.

Animal Husbandry
Kolhapur Animal Husbandry Department : कोल्हापूर पशुसंवर्धन विभागाकडून योजनांसाठी ५० लाखांपर्यंत अनुदान

साखर कारखाने सुरु झाले आहेत. याठिकाणी ऊस तोडणी मजूरांकडेही जनावरे असतात. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने कारखाना आणि जिल्ह्याच्या सीमेवरील १२ हजार जनावरांना लसीकरण केले आहे.

वास्तविक पाहता सप्टेंबर महिन्यापर्यंत लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, लाख खुरकतच्या लसींची कमतरता असल्याने जिल्ह्यातील जनावरांना लसीकरण करण्याची मोहिम राबवली नाही. परिणामी डिसेंबर संपत आला तरी अजूनही संबंधित विभागाकडे लस उपलब्ध नाही. त्यामुळे ८ लाख ६ हजार ७५४ जनावरांचे लसीकरण अद्यापही झाले नाही. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी शासकीय, खासगी प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.

लस कधी उपलब्ध होणार?

जिल्ह्यात लाळ खुरकत लसींचा तुडवडा आहे. त्यामुळे लसीकरण करण्यास अडचणी आहेत. लसीकरण पूर्ण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने राज्य शासनाकडे ६ लाख ९५ हजार ९०० लसींची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही लसी उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे लस कधी उपलब्ध होणार असा प्रश्न पशूपालक करत आहेत.

Animal Husbandry
Animal Husbandry Department : दिड लाख जनावरांना वंध्यत्वाचा त्रास, पशुसंवर्धन विभागाचे लसीकरणासाठी आवाहन

‘लाळ्या खुरकत’ची लक्षणे...

सुरवातीस जनावरांना ताप येतो

जिभेला, पायात खुरांना जखमा

चारा, पाणी खाणे बंद झाल्याने जनावरे क्षीण

दूध उत्पादन घटल्याने आर्थिक नुकसान

संकरित जनावरे या आजाराला अधिक बळी

‘लाळ्या खुरकत’ची शिल्लक लस साखर कारखाना परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी जनावरांना दिलेली आहे. पुढील आठवड्यात सांगली जिल्ह्यासाठी लस उपलब्ध होणार आहे. त्यानंतर जनावरांना लसीकरण सुरू करण्यात येईल.
डॉ. अजय थोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, मिरज (सांगली)

जिल्ह्यातील एकूण पशुधन

गाय ३ लाख २४ हजार ७५६

म्हैस ४ लाख ९३ हजार ९९८

शेळी ४ लाख ५४ हजार १२५

मेंढी १ लाख ३० हजार ७५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com