Animal Vaccination : रायगडमध्ये पशुसंवर्धनकडून ७० हजार जनावरांचे लसीकरण

Infectious diseases : पावसाळ्यात उद्धभ्वणाऱ्या संसर्गजन्‍य आजारांमुळे पशूधनाची हानी होते. त्‍यामुळे या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे.
Animal Vaccination
Animal VaccinationAgrowon

Alibaug News : पावसाळ्यात उद्धभ्वणाऱ्या संसर्गजन्‍य आजारांमुळे पशूधनाची हानी होते. त्‍यामुळे या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील गाय, म्हैस, शेळी मेंढ्या आदी ७० हजार १६६ जनावरांचे लसीकरण करण्यात संबंधित विभागाला यश आले आहे.

रायगड जिल्ह्यात तीन हजार मि. मी. पेक्षा अधिक पाऊस पडतो. अनेक वेळा पूरपरिस्थिती निर्माण होते. या बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजार होतात. विषारी जिवाणू अधिक सक्रीय होतात. यामुळे गायी, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या पशू व पक्षांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार सारखे रोग होतात.

ताप येणे, श्‍वसन नलिका सूजणे, नाकातून चिकट स्त्राव येणे ही घटसर्प आजाराची लक्षणे आहेत. या आजारावर वेळेत उपचार न केल्यास जनावरांचा मृत्यू होतो. या रोगामुळे जनावरांमधील प्रतिकार शक्ती कमी होते. उत्पादन क्षमता कमी होते.

Animal Vaccination
Animal Infectious Diseases : जनावरांतील संसर्गजन्य आजारांवर उपचार...

त्यामुळे या संसर्गजन्य रोगांवर मात करण्यासाठी तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी पशूसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. या आजारावर नियंत्रणासाठी महिनाभरापासून प्रत्येक तालुक्यात लसीचे वितरण करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यामध्ये घटसर्पाचे ३० हजार ५८१ व आंत्रविषार ३९ हजार ५८५ लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

पावसाळ्यात पशुंना होणाऱ्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणाचे काम महिन्याभरापासून सुरु करण्यात आले. लसीकरण शंभर टक्के पूर्ण झाले आहे. गाय म्हैस, शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण झाले आहे.
डॉ. शाम कदम, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभाग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com