lakdi Ghana Oil : घाण्याच्या तेलाला बाजारात मागणी

Edible Oil : मधल्या काळात रिफाइंड तेलाच्या वापरामुळे जवळजवळ लाकडी घाण्यावरील तेलाचा व्यवसाय संपला होता.
Lakdi Ghana Oil
Lakdi Ghana OilAgrowon

Edible Oil Market : मधल्या काळात रिफाइंड तेलाच्या वापरामुळे जवळजवळ लाकडी घाण्यावरील तेलाचा व्यवसाय संपला होता. पण, सध्या वाढत्या प्रदूषणामुळे अनेक जण रसायनविरहित सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले तेल वापरणे पसंत करत आहेत.

त्यामुळे पुन्हा ग्रामीण भागांसह शहरात घाण्याच्या तेलाला चांगले दिवस येऊ लागले आहेत. या तेलामुळे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते. तेलाची मागणी वाढल्यामुळे डोंबिवली शहरात काहींनी लाकडी घाण्याचा व्यवसाय पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे तेल घेणाऱ्यांची गर्दीही वाढत आहे.

पूर्वी ग्रामीण भागात तेल काढण्याचे घाणे होते. अनेक व्यावसायिकांच्या हाताखाली काम करणाऱ्या मजुरांनाही काम मिळत होते. गावात शेतकरी शेतात पिकवलेले करडई, सूर्यफूल, शेंगदाणे, तीळ हे गळीत धान्य घाण्यावर नेऊन त्याचे तेल काढून घेत. शिवाय, पशुखाद्य म्हणून सरकी, करडी पेंढीचा उपयोग व्हायचा.

Lakdi Ghana Oil
Edible Oil Import : खाद्यतेल आयातीवर १.२३ लाख कोटी खर्च

रसायनविरहित तेल खायला मिळत होते. दरम्यान रिफाइंड तेलाच्या वापरामुळे या व्यवसायाला उतरणी लागली होती. परंतु, आरोग्याच्या अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांनी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला खाण्याचे शुद्ध तेल मिळावे म्हणून पुन्हा तेलबियांचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, करडई, सूर्यफूल, भुईमूग या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पारंपरिक उद्योगांपैकी एक असलेला लाकडी घाणा तेल उद्योगाला आता पुन्हा चांगले दिवस येत आहेत.

मागणीत वाढ

सध्या लाकडी घाण्याच्या तेलाला बाजारात चांगली मागणी आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, मोहरी, जवस आदी तेलबियांचे लाकडी घाण्यामधून तेल काढले जाते. फोडणी देण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी खाद्यतेल गरजेचे असते. खाद्यतेल आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोणते खाद्यतेल आहारात वापरायला हवे हेदेखील महत्त्वाचे ठरते.

Lakdi Ghana Oil
Lakadi Ghana Oil : सात्त्विक ब्रॅण्ड तेलांना थेट ग्राहक बाजारपेठ

अनेकांच्या हाताला काम

लाकडी घाण्यातील तेल प्रक्रियेत गळीत धान्य निवडण्यापासून ते तेल मिळेपर्यंतच्या विविध स्तरांवर कामगारांची आवश्यकता असते. त्यामुळे कामगारांना रोजगार उपलब्ध होत आहे.

पोषक घटकांचा समावेश

घाण्यावर काढलेल्या तेलाला नैसर्गिक सुगंध आणि आवश्यक पोषक घटकांचे उत्तम प्रमाण असते. त्या‍मुळे काही दिवसांत लाकडी घाण्यावरील तेलाला ग्राहकांची पसंती मिळत आहे. रिफाइंड तेलाच्या तुलनेत घाण्यावरील तेलाची वाढत असलेली मागणी फिटनेसबाबतची जागरूकता निर्माण करते.

...असे आहेत तेलाचे दर (रुपयांत)

तेल भाव (१ लिटर)

शेंगदाणा ३००

सूर्यफूल ३५०

खोबरेल ५००

मिक्स ३८०

मोहरी ३२०

बदाम ११०० (अर्धा लिटर)

अक्रोड १५०० (अर्धा लिटर)

पोषक घटकांचा समावेश

घाण्यावर काढलेल्या तेलाला नैसर्गिक सुगंध आणि आवश्यक पोषक घटकांचे उत्तम प्रमाण असते. त्या‍मुळे काही दिवसांत लाकडी घाण्यावरील तेलाला ग्राहकांची पसंती मिळत आहे. रिफाइंड तेलाच्या तुलनेत घाण्यावरील तेलाची वाढत असलेली मागणी फिटनेसबाबतची जागरूकता निर्माण करते.

घाण्याच्या तेलाला मागणी वाढत आहे. हे तेल शुद्ध आणि रसायनविरहित असते. आरोग्याचा विचार केला तर येत्या काळात आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे.
- अविनाश शेंद्रे, विक्रेता

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com