Anandacha Shidha Yojana : आनंदाचा शिधा, ‘शिवभोजन’ बंद पडण्याचे संकेत

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेने आनंदाचा शिधा व शिवभोजन थाळी या योजना अडचणीत आल्या आहेत. आर्थिक तरतूद नसल्याने या दोन्ही योजना आगामी काळात बंद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Government Scheme
Government Scheme Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : लाडकी बहीण योजनेने आनंदाचा शिधा व शिवभोजन थाळी या योजना अडचणीत आल्या आहेत. आर्थिक तरतूद नसल्याने या दोन्ही योजना आगामी काळात बंद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. यंदा गणेशोत्सवात शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार नाही, तर शिवभोजन थाळी योजनेच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा योजना प्रारंभ करण्यात आली होती. रेशनवर धान्य मिळणाऱ्या अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारकांना हा शिधा देण्यात येत होता. गणेशोत्सव, दिवाळी व गुढीपाडवा, अशा तीन सणासुदीला शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा मिळत होता.

Government Scheme
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी सरकारला खेचणार न्यायालयात; निवडणुकीआधी पात्र, निवडणुकीनंतर अपात्र कसे?

यामध्ये साखर, गोडेतल, रवा, पोहे व डाळ असे धान्य प्रत्येकी एक किलो मिळायचे. यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव आहे. कार्डधारक आनंदाच्या शिधाची प्रतीक्षा करू लागले असताना त्यांना तो मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्यात पाच लाख २ हजार ५४२ कार्डधारक आहेत. यापैकी अंत्योदय गटात १ लाख २८ हजार २०७ कार्डधारक व प्राधान्य गटात ३ लाख ७४ हजार ३३५ कार्डधारक आहेत. यापूर्वी या कार्डधारकांना जूनमध्ये एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य वितरित करण्यात आले आहे. आता त्यांना सप्टेंबरमध्ये धान्य वितरित केले जाणार आहे.

Government Scheme
Ladki Bahin Yojana : एक लाख ‘लाडक्या बहिणीं’च्या पडताळणीला सुरुवात

अशातच आनंदाचा शिधादेखील बंद करण्यात आला आहे. या योजनेमुळे राज्य सरकारला करावी लागणारी आर्थिक तरतूद लाडकी बहीण योजनेमुळे करता आलेली नाही. २६ जानेवारी २०२० पासून राज्यात गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात शिवभोजन थाळी देण्याची योजना सुरू केली. या योजनेसाठी १२० कोटी रुपये पुरवठा विभागास मिळत होते, त्यामध्ये शंभर कोटींनी कपात करण्यात आली आहे.

लाभार्थ्यांकडून दहा रुपये घेण्यात येत असून चाळीस रुपये राज्य सरकारचे अनुदान आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. याशिवाय निर्धारित लाभार्थी संख्येपेक्षा अधिक लाभार्थी येतात. व्यवस्थेवरील खर्च व जीएसटी मिळून येणारा एकूण खर्च बघता मिळणारे अनुदान तोकडे असले तरी सेवाभाव जपत योजना सुरू ठेवली आहे.
- दिनेश बूब, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ, शिवभोजन केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com