

Solapur News : कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना एकूण सहा टप्प्यात होणार असून त्याअंतर्गत बीड, धाराशिव, वाशी, भूम, परांडा, कळंब, लोहारा, उमरगा व तुळजापूर या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी एकूण सात टीएमसी पाणी उजनी धरणातून नेले जाणार आहे. निरा नदीतून उजनीत पाणी आल्यावर ते योजनेअंतर्गत पुढे नेले जाणार आहे. तरीपण, ऑगस्टमध्ये सीना-कोळेगाव धरणातून पाणी या योजनेत सोडून प्रात्यक्षिक घेण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे.
निरा नदीतील पाणी उजनी धरणात आल्यानंतर तेथून ते मराठवाड्यातील नऊ तालुक्यांना दिले जाणार आहे. उजनीतील सात टीएमसी पाणी १५० किमी अंतरावर नेले जाणार आहे. त्यात बीडसाठी १.६८ टीएमसी, धाराशिव, वाशी, भूम, परांडा व कळंब या तालुक्यांसाठी ३.८ टीएमसी आणि लोहारा, उमरगा व तुळजापूर या तालुक्यांसाठी २.२४ टीएमसी पाणी असणार आहे.
सध्या घाटणे (ता. मोहोळ) ते रामदरा (ता. तुळजापूर) तलावापर्यंत (५६ ते ६० किलोमीटर) एक टीएमसी पाणी नेण्याचे नियोजन आहे. सध्या निरेतून उजनीत पाणी आणण्यासाठी बोगद्याचे काम सुरू असून त्यासाठी किमान दीड-दोन वर्षे लागतील, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. तोपर्यंत सीना-कोळेगाव धरणातून वाहून जाणारे पावसाचे पाणी रामदरा तलावार्यंत नेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये योजनेच्या घाटणे ते रामदरा तलाव या टप्प्याचे ट्रायल (प्रात्यक्षिक) होणार आहे.
खरेदी-विक्री व्यवहार, बाजार मूल्यानुसार मिळणार मोबदला
कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेसाठी मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील सहा गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यात मोहोळमधील खुनेश्वर, भोयरे, हिंगणी तर उत्तर सोलापुरातील पडसाळी, गावडी दारफळ व कळमण ही गावे आहेत. काही शेतकऱ्यांनी मोबदल्यावरून विरोध केला असून काहींच्या परवानगीशिवाय कॅनॉलसाठी खोदकाम करण्यात आल्याच्या त्यांच्या हरकती आहेत.
या अनुषंगाने भूसंपादन अधिकाऱ्यांनी हरकती मागविल्या आहेत. बाधित जमिनीचे ॲवॉर्ड झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांसोबत अधिकाऱ्यांच्या बैठका होतील. त्यांच्या हरकतीनुसार पंचनामे होऊन मोबदला निश्चित (बाजारमूल्य किंवा खरेदी-विक्री व्यवहारानुसार जी रक्कम जास्त असेल ती) करून संबंधित शेतकऱ्यांना रक्कम वितरीत होईल. त्यानंतर उर्वरित काम केले जाणार आहे.
योजनेचे ‘हे’ टप्पे पूर्णत्वाकडे
भोयरे पंपहाऊस पाच किमी रायझिंग मेन व १७.५ किमी कॅनॉल
डसाळी पंपहाऊस चार किमी रायझिंग मेन व ७ किमी कॅनॉल
सावरगाव पंपहाऊस एक किमी रायझिंग मेन व चार किमी कॅनॉल
पांगरदरवाडी पंपहाऊस ५०० मीटर रायझिंग मेन व ११ किमी कॅनॉल
सिंदफळ पंपहाऊस ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.