Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Konkan Fruits : कोकणातील रानमेव्याला बदलत्या वातावरणाचा फटका बसला असून करवंद, जांभूळ, चारोळी, रायवळ आंबा यासह विविध रानमेवा हंगाम यावर्षी लांबला आहे.
Konkan Ranmeva
Konkan Ranmevaagrowon

Konkan Farmers : कोकणातील रानमेव्याला बदलत्या वातावरणाचा फटका बसला असून करवंद, जांभूळ, चारोळी, रायवळ आंबा यासह विविध रानमेवा हंगाम यावर्षी लांबला आहे. त्यामुळे रानमेव्यावर अवलंबून असलेले हजारो कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे सध्या चित्र आहे.

आंबा, काजू, कोकम, सुपारी, नारळ ही कोकणातील प्रमुख फळपिके असली तरी याशिवाय कोकणातील जंगलांमध्ये विविध नैसर्गिक फळझाडे आहेत. यामध्ये रायवळ आंबा, करवंद, जांभूळ, चारोळी, बोरे यासह अनेक झाडे जंगलामध्ये आहेत. कोकणातील हा रानमेवा साधारणपणे मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो.

कोकणातील सर्व डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात करवंद आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करवंद हंगाम सुरू होतो. करवंदला मोठी मागणी असते. अनेक महिला करवंदाची काढणी करून ती किलो किवा टोपलीच्या आकारानुसार विक्री करतात. एप्रिल, मे दोन महिने साधारणपणे हा हंगाम चालतो.

या कालावधीत लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु, आता मे महिना उजाडला तरी अजूनही करवंद हंगाम सुरू झालेला नाही. अजूनही दहा ते पंधरा दिवस हा हंगाम सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे यावर्षी हा हंगामच वाया जाण्याची शक्यता आहे. करवंदाप्रमाणे चारोळी हंगामापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Konkan Ranmeva
Konkan Coconut : कोकणात नारळ पिकाला मोठा फटका, ४० टक्के उत्पादन घटलं

रायवळ आंबा हंगामदेखील लांबणार आहे. जांभूळ हंगामाचीही तीच गत आहे. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम मानला जात असून, कोकणातील सर्वच फळपिके संकटात आहेत. करवंद, चारोळी आणि रायवळ आंबा या पिकांचे उत्पादन तर शेतकऱ्यांना कोणताही खर्च न करता मिळते. परंतु, हे उत्पादन मिळणे कठीण होण्याचे संकेत मिळतं आहेत. त्यामुळे रानमेव्यावर अवलंबून असलेली हजारो कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटण्याची शक्यता आहे.

चिंताजनक संकेत

कोकण हे विविध जैवविविधतेने नटलेले आहे. कोकण हा एकमेव प्रांत आहे, जिथे नैसर्गिक फळ झाडांची संख्या मोठी असून, त्या फळांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील करवंद आणि जांभूळाला सोलापुरसह राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातील बाजारपेठांमध्ये मोठी मागणी आहे. प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांपर्यंत दर या फळांना मिळतो. हे उत्पादन घेण्यासाठी कोणताही उत्पादनखर्च येत नाही.

या फळांची काढणी मात्र आजही हातानेच करावी लागते. लाखो रुपयांची उलाढाल या फळांपासून होते. मात्र, यावर्षी या फळांचा हंगामच लांबला आहे. वातावरणातील बदलात कोकणातील रानमेवा संकटात सापडल्याने भविष्याच्या दृष्टीने हे चिंताजनक संकेत मानले जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com