Konkan Coconut : कोकणात नारळ पिकाला मोठा फटका, ४० टक्के उत्पादन घटलं

sandeep Shirguppe

नारळ उत्पादन

कोकणात नारळ उत्पन्नाचे महत्वाचं स्त्रोत म्हणून ओळखलं जातं, परंतु यंदा कोकणात नारळ उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Konkan Coconut | agrowon

लांबलेला पाऊस

लांबलेला पाऊस, जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पांढरी माशी, कोळेरोगांसह विविध कीड-रोगांचा प्रादुर्भावामुळे नारळ उत्पादनात ४० टक्क्यांनी घट झाली आहे.

Konkan Coconut | agrowon

नारळावर परिणाम

आंबा, काजू, सुपारीपाठोपाठ सुरक्षित मानले जात असलेले नारळ पीकदेखील बदलत्या वातावरणाचा बळी ठरत आहे.

Konkan Coconut | agrowon

सर्वाधिक लागवड सिंधुदुर्ग जिल्ह्यात

राज्यात ३३ हजार हेक्टरवर नारळ लागवड असून, त्यातील १८ हजार हेक्टर लागवड ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.

Konkan Coconut | agrowon

नारळाची लागवड

नारळ उत्पादन जिल्ह्याच्या सर्वच भागांत घेतले जात असले तरी वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, मालवण या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवड आहे.

Konkan Coconut | agrowon

पोषक वातावरण

पोषक वातावरण आणि कीड-रोगांचा किमान प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत नारळ पिकांची लागवड वाढली आहे.

Konkan Coconut | agrowon

पुरेसा पाऊस नाही

मॉन्सूनचा पुरेसा पाऊस न मिळाल्याने जिल्ह्यात एप्रिल-मेमध्ये नारळाच्या झाडांना पुरेसे पाणी मिळत नाही. याचा विपरीत परिणाम नारळ पिकांवर झाला.

Konkan Coconut | agrowon

झावळ्यांचा आकारदेखील कमी

नारळाच्या झावळ्यांचा आकारदेखील या कालावधीत कमी झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Konkan Coconut | agrowon

नारळ पीक संकटात

बदलत्या वातावरणापासून सुरक्षित मानले जाणारे नारळ पीकदेखील संकटात सापडले आहे.

Konkan Coconut | agrowon

बागायतदारांना फटका

निम्मेच उत्पादन आल्यामुळे नारळ बागायतदारांना फटका बसला आहे.

Konkan Coconut | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.