Kolhapuri Chappal : कोल्हापुरी चपलेला आता ‘क्यूआर कोड’

Blockchain Technology : शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी केला आहे.
Kolhapuri Chappal
Kolhapuri ChappalAgrowon

Pune News : शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी केला आहे. कोल्हापुरी चपलेस ‘क्यूआर कोड’ दिला आहे. तसेच चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चीप बसवली आहे. ही चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ती कुठे कोणत्या कारागिराने बनवली, याची माहिती मिळेल. त्यामुळे बनावट कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्यांना चाप बसेल.

‘लिडकॉम’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय मुंबई येथे आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. कोल्हापुरी चपलांकरिता ब्लॉक चैन अंतर्गत ‘क्यूआर कोड’ प्रणालीचे अनावरण राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. १ मार्च २०२४ पर्यंत प्रदर्शन व विक्री सुरू राहील.

Kolhapuri Chappal
Farm Management : काटेकोर व्यवस्थापन हेच शेतीचे सूत्र

या वेळी आमदार सरोज आहिरे, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, ‘लिडकॉम’चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संजय खामकर, ‘हिंदुस्थान ॲग्रो’चे डॉ. भारत ढोकणे पाटील आदी उपस्थित होते.

करीर म्हणाले, ‘‘‘लिडकॉम’तर्फे विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत राज्यातील २५ हजार युवकांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे युवकांना स्वयंरोजगार मिळेल.’’

सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे म्हणाले, ‘‘सामाजिक न्याय विभागातर्फे एक लाख उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील २५ हजार उमेदवारांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन होत आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध केंद्र व राज्यशासनाच्या योजना राबविल्या जात आहेत.’’

Kolhapuri Chappal
Watermelon Production : आमचा माल आम्हीच थेट विकू...

चांगली कोल्हापुरी चप्पल ग्राहकांना मिळावी, यासाठी ‘लिडकॉम’ने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. हा प्रयोग यापूर्वी महाराष्ट्रात नाशिक येथील सह्याद्री फार्म येथील विविध प्रकारच्या फळभाज्यांबरोबरच कापूस, रबरच्या विक्रीमध्ये केला गेला आहे.

चर्मोद्योग व्यवसायवाढीसाठी लिडकॉम नेहमीच पुढाकार घेतला आहे. रायगडमध्ये मेगा लेदर क्लस्टर पार्क व देवनार येथे लेदर पार्क उभारण्यात येईल. राज्यात क्लस्टर धोरण असावे, या साठी ‘लिडकॉम’च्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे.
धम्मज्योती गजभिये, व्यवस्थापकीय संचालक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com