Kolhapur Market Committee : कोल्हापूर बाजार समितीत अचानक कांदा बटाटा वाहतूक अडवली, काही काळ गोंधळ

Onion Potato Transoport : कांदा-बटाटा नाशवंत असल्याने त्याची वाहतूक रोखता येणार नसल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.
Kolhapur Market Committee
Kolhapur Market Committeeagrowon
Published on
Updated on

Market Committee Onion : मागच्या काही दिवसांपासून माल वाहतूक संघटनेचा संप सुरू आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधात वाहतूक संघटना आक्रमक झाल्याने अनेक राज्यात वाहतूक सेवा सुरळीत सुरू नसल्याने दळणवळणावर परिणाम झाला आहे. दरम्यान काल अचानक कोल्हापूर बाजार समितीत वाहतूक अडवण्यात आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये वाहतूक संघटनेचे युवराज माने यांनी संप असल्याने माल भरायचा नाही, असे सांगत वाहतूक रोखली. यावर तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली.

सध्या देश पातळीवर वाहतूक संघटनांचा संप आहे; पण जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक सुरूच आहे. काल(ता.१०) बुधवारी बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये वाहूतक संघटनेचे माने आले आणि संप असल्याने माल भरू नका, असे सांगितले.

त्यानंतर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांच्यासह पोलीस आले. पोलिसांनी संबंधितांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांना बोलावून पोलीस निरीक्षक अजयसिंह सिंदकर यांनी समजावून सांगितले.

कांदा-बटाटा नाशवंत असल्याने त्याची वाहतूक रोखता येणार नसल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले. त्यानंतर बाजार समितीतील वाहतूक सुरळीत झाली. यावेळी बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा, सचिव जयवंत पाटील आदी उपस्थित होते.

Kolhapur Market Committee
Onion Export Ban : पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी तापला कांदा निर्यातबंदी मुद्दा

काय आहे कायदा?

नवीन कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणामध्ये रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि वाहनचालकाने तिथून पळ काढला तर चालकाला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि सात लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

आधी अशा प्रकरणांमध्ये चालकाची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ (निष्काळजीपणे वाहन चालवणे), ३०४A (निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे) आणि ३३८ (जीव धोक्यात घालणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात यायचा. यामध्ये दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद होती.

पण अनेक अपघातानंतर वाहनचालक पळून जात होते आणि काही दिवसांमध्येच आरोपी ट्रक चालकाला जामीन मिळत होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com