Kolhapur Agriculture Work : वळवाच्या पावसाने शेतीकामांना गती, खरिपासाठी शेतकऱ्यांची धांदल

Farmers Kharip Crop : कोल्हापूर जिल्ह्यात उसाच्या लावणीबरोबरच सोयाबीन, भुईमूग यांसह इतर पीक लागवडीसाठी शेतकऱ्‍यांचे नियोजन सुरू आहे.
Kolhapur Agriculture Work
Kolhapur Agriculture Workagrowon

Kolhapur Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्यात मे महिना शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा देणारा ठरला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वळीवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऐन दुष्काळी परिस्थितीत ऊस पिकासह अन्य पिकांना जिवदान मिळालं आहे.

यंदा वळीवाच्या पावसाने साथ दिल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. खरिपाच्या पेरणीसह आडसाली उसाच्या लागणीसाठी नियोजनाची धांदल सुरू असल्याचे दिसून येत आहे.

शिरोळ तालुक्यात अनेक वेळा दुधगंगा नदी कोरडी पडल्याने पाणी परिस्थिती गंभीर बनली होती. परंतु झालेल्या वळवाच्या पावसाने तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, चिपरी, कोंडीग्रे यांसह अन्य गावांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान कृषी विभागाने खरीप हंगामातील पिकांच्या बी-बियाण्यांसह खते व औषधांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात उसाच्या लावणीबरोबरच सोयाबीन, भुईमूग यांसह इतर पीक लागवडीसाठी शेतकऱ्‍यांचे नियोजन सुरू आहे.

ऐंशी टक्के मशागत पूर्ण

कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा व वारणा पट्ट्यातील अनेक गावात खरिप पेरणीच्या हंगामाची तयारी जोरदार सुरू आहे. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, उदगाव, दानोळी, कोथळी, नांदणी, शिरोळ, आलास, कुरुंदवाड, अब्दुललाट, शिरढोण, दत्तवाड, खिद्रापूर, सैनिक टाकळी, कवठेगुलंद यांसह परिसरात शेतीची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. सुमारे ऐंशी टक्के शेताची मशागत पूर्ण झाली आहे.

कृषी विभागाकडून प्रात्यक्षिक

एका शिरोळ तालुक्यात खरिपामध्ये सोयाबीन २ हजार हेक्टरवर, भुईमूग १ हजार ६००, मूग ४५, उडीद २५० यांसह अन्य पीक, तृणधान्य यांची मोठ्या प्रमाणावर लागवड होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील कृषी विभागाकडून शेतकऱ्‍यांना बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या चाचणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबीन घेतलेल्या शेतात सोयाबीनच्या शेंगा आल्या नव्हत्या. त्यामुळे सध्या चांगल्या दर्जाचे बियाणे वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

रोपवाटिकांसाठी लगबग

शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाच्या रोपवाटिका आहेत. येथील रोपे मराठवाडा, पुणे, सूरत, नाशिक, बेळगाव, कलबुर्गी, रायचूर यांसह विविध भागांत जातात. त्यामुळे उसाची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिकांमध्ये लगबग सुरू आहे.

Kolhapur Agriculture Work
Agriculture Water Dams : कोल्हापुरातील मोठ्या धरणांत गतवर्षीपेक्षा जास्त पाणीसाठी, वळीव पावसाने दिलासा

कृषी विभागाशी संपर्क साधा

शेतकऱ्‍यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पावतीसह बियाणे खरेदी करावीत. बियाण्यांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. बियाणे पाकिटे, सीलबंद मोहरबंद असल्याची खात्री करावी तसेच पाकिटावरची अंतिम मुदत पाहूनच खरेदी करावी.

शिवाय खरिपासाठी लागणारी खते यांचा पुरवठा केला आहे. शेतकऱ्‍यांना काही अडचण असल्यास कृषी सहायक किंवा मंडल, तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिरोळ तालुक्याचे कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे-पाटील यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com