Kolhapur Assembly Elections : कोल्हापूर जिल्ह्यात दुरंगी आणि तिरंगी लढतीने धुरळा उडणार, बंडखोरांचे आव्हान

Kolhapur Politics : सर्वच मतदारसंघांत अपक्ष व अन्य छोट्या पक्षांचे उमेदवार असले, तरी प्रमुख पक्ष व त्यांच्या उमेदवारांचा विचार करता सर्वच मतदारसंघांत दुरंगी, तिरंगी लढती होणार आहेत.
Kolhapur Assembly Elections
Kolhapur Assembly Electionsagrowon
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारी (ता.०४) अखरेच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्याने राज्यभर चर्चा होती. दरम्यान दहाही मतदारसंघातील लढती दुरंगी आणि तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर दक्षिण, उत्तर, इचलकरंजी, कागलसह शाहूवाडीत दुरंगी, तर हातकणंगले, शिरोळमध्ये तिरंगी लढती होणार आहेत. चंदगड, राधानगरी, करवीरमध्ये महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने कोणता गट सरस ठरतो हे निकालातून स्पष्ट होण्याचे चित्र आहे.

करवीर मतदारसंघात शिंदे सेनेच्या विरोधात संताजी घोरपडे, तर चंदगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाविरोधात मानसिंग खोराटे हे ‘जनसुराज्य’कडून रिंगणात उतरले आहेत. त्यातून महायुतीत बेबनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वच मतदारसंघांत अपक्ष व अन्य छोट्या पक्षांचे उमेदवार असले, तरी प्रमुख पक्ष व त्यांच्या उमेदवारांचा विचार करता सर्वच मतदारसंघांत दुरंगी, तिरंगी लढती होणार आहेत.

निवडणुकीत ‘जनसुराज्य’ने शाहूवाडीसह तीन जागांची मागणी केली होती; पण त्यांना शाहूवाडीची एकच जागा मिळाली. त्या ठिकाणी डॉ. कोरे यांच्याविरोधात ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर हे पारंपरिक विरोधक उभे ठाकले आहेत. हातकणंगलेची जागा ‘जनसुराज्य’ने मागितली होती; पण त्यांच्या अशोकराव माने यांना शिंदे सेनेतून उमेदवारी जाहीर झाली. हातकणंगलेत विद्यमान आमदार राजू आवळे, अशोकराव माने व शिवसेना ठाकरे गटातून स्वाभिमानीत गेलेले माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर अशी तिरंगी लढत होत आहे.

Kolhapur Assembly Elections
Kolhapur Congress : कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे यांची माघार, राजेश लाटकर काँग्रेसचे उमेदवार?

शिरोळमध्ये ऐनवेळी ठाकरे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत माजी आमदार उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीचा झेंडा घेतला. त्यांच्याविरोधात महायुतीतून राजेंद्र पाटील-यड्रावकर व काँग्रेसचे गणपतराव पाटील असा तिरंगी सामना आहे. चंदगडमध्ये महायुतीत भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू शिवाजी पाटील व काँग्रेसकडून इच्छुक अप्पी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्या ठिकाणी महायुतीकडून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील, तर महाविकासकडून डॉ. नंदिनी बाभूळकर रिंगणात आहेत.

राधनगरीतून महाविकासची उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असलेले जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनीही बंडखोरी करत पक्षासमोर आव्हान उभे केले आहे. आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला आहे व माजी आमदार के. पी. पाटील हे उमेदवार आहेत. इचलकरंजीतही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी केली असली तरी खरी लढत भाजपचे राहुल आवाडे व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मदन कारंडे यांच्यातच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Agrowon
agrowon.esakal.com