Silk Market
Silk MarketAgrowon

Sericulture : बारामतीत उभारतेय कोषोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र

Mulberry Cultivation : पुणे विभागात चालू वर्षी ७७० शेतकऱ्यांनी ९८४ एकरांवर तुती लागवड झाली आहे. तर सध्या विभागात पाच हजार ६२४ शेतकऱ्यांनी सहा हजार २७२ एकरावर तुती लागवड केली आहे.
Published on

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तुती रेशीम कोषांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. तसेच कोषोत्तर प्रक्रियेला चालना मिळावी या उद्देशाने बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात एक एकर जागेवर रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ व कोषोत्तर प्रक्रियेचे पथदर्शक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. सध्या या केंद्राचे काम वेगाने सुरू असून लवकरच हे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार, असल्याची माहिती जिल्हा रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

पुणे विभागात चालू वर्षी ७७० शेतकऱ्यांनी ९८४ एकरांवर तुती लागवड झाली आहे. तर सध्या विभागात पाच हजार ६२४ शेतकऱ्यांनी सहा हजार २७२ एकरावर तुती लागवड केली आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात रेशीम कोषाचे उत्पादन होत असून या कोषाची विक्री बारामती, बीड, जालना तसेच कर्नाटकमधील रामनगर येथे शेतकरी विक्री करतात.

Silk Market
Sericulture : रेशीम कोष काढणीपश्चात संधीवर मंथन

परंतु शेतकऱ्यांनी रेशीम आधारित प्रक्रियेकडे वळविण्यासाठी रेशीम संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या केंद्रामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम प्रक्रियेचे प्रशिक्षण देऊन मदत करण्यात येणार आहे. जेणेकरून प्रक्रिया उद्योग वाढीस लागून तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहे.

शासनामार्फत या प्रशिक्षण केंद्राच्या सोयी सुविधा उभारण्यासाठी सुमारे ९ कोटी ५६ लाख ६२ हजार रुपये इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार बारामती येथे रेशीम प्रशिक्षण केंद्राच्या सोयी सुविधा उभारण्यासाठी दोन टप्यांत सर्व निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रशिक्षण केंद्रावर सुमारे १५० -२०० शेतकरी बसतील एवढा कार्यक्रम हॉल बांधण्यात येत आहे.

Silk Market
Sericulture : आदिवासी भागातील हिरकणींकडून रेशीम शेती

तसेच कोषोत्तर प्रक्रिया प्रशिक्षणासाठी एका बॅचला २० प्रशिक्षणार्थी बसू शकतील एवढे प्रशिक्षण हॉल, चरखा युनिट, कॉटेज बेसीन, मल्टिएन्ड रिलीग मशिन, अँटोमेटिक रिलिग मशिन असे छोटे छोटे युनिट बसवून प्रशिक्षणार्थीना प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय किमान वीस प्रशिक्षणार्थींना राहण्याची सुविधा, कन्वेर हॉट एअर ड्रायर, रेशीम कार्यालयाचे तालुका कार्यालय, रेशीम कोष खरेदी विक्रीचे कार्यालय, विस्ताराचे कार्यालय येथे राहणार आहे. सध्या केंद्राचे २५ -३० टक्केपर्यंत काम पूर्ण झाले आहे. येत्या वर्ष भराच्या आत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे.

राज्यातील कोषोत्तर प्रशिक्षण केंद्र नाही. त्यामुळे रिलिंगमध्ये कुशल मजूर मिळत नसल्याने रिलिंगधारकांना अडचण येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून कुशल मजूर मिळणार असून कोषोत्तर प्रक्रियेला राज्यात चालना मिळेल.
-डॉ. कविता देशपांडे, सहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय, पुणे
प्रशिक्षण केंद्रासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची मोठी मदत झाली आहे. या कामी जवळपास एक एकर जागा देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना व कोषोत्तर प्रक्रिया लाभार्थी यांना चांगल्या प्रशिक्षणाची सोय होणार आहे.
- संजय फुले, रेशीम विकास अधिकारी, पुणे,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com