Agrowon Samvad : आपला ग्राहक ओळखून केंद्राची उभारणी करा

Agri Tourism : कृषी पर्यटन उभारणी करण्याअगोदर आपला ग्राहक लक्षात घेऊन त्यापद्धतीने उभारणी करावी.
Agrowon Samvad
Agrowon Samvad Agrowon

Satara News : कृषी पर्यटन उभारणी करण्याअगोदर आपला ग्राहक लक्षात घेऊन त्यापद्धतीने उभारणी करावी. केंद्रावर शेळीपालन, गाईपालन, मधुमक्षिका, मत्स्यशेती यासारखे पूरक व्यवसाय उभे करावेत. या पूरक व्यवसायातील कामात पर्यटकांना शेती समजावी यासाठी त्यांना कामात सहभागी करून घेता येईल का, ते पाहावे. ग्राहकापर्यंत पोहण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे गरजेचे असल्याचे बारामती केव्हीकेचे कृषी पर्यटन विभाग प्रमुख आनंद दरवेशी यांनी सांगितले.

कोयनानगर (ता. पाटण) येथील निशिगंध अॅग्रो टुरिझम केंद्रावर अॅग्रोवन व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संयुक्त विद्यमानाने ‘इको अॅग्रो टुरिझम’ या विषयावर अॅग्रोसंवाद कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते.

Agrowon Samvad
Agri Tourism Center : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गजानन कुडाळकर यांचे कोकण हेरिटेज कृषी पर्यटन केंद्र

या वेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. राजेंद्र सरकाळे, सहव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, माजी सभापती राजाभाऊ शेलार, बाजार समितीच्या माजी सभापती रेखाताई पाटील, संचालक आनंदराव पवार, माजी पंचायत समिती सदस्य पी. एल. माने, कमलाकर काजवे, वसंतराव टोळे, रोहिणी पाटील, स्नेहल जाधव, व्यवस्थापक वाय.जे. साळुंखे, अॅग्रोवन जिल्हा प्रतिनिधी विकास जाधव, वितरण प्रतिनीधी दत्ता जाधव आदी उपस्थित होते.

श्री. दरवेशी पुढे म्हणाले, ‘‘अॅग्रो टुरिझम करताना इको टुरिझम करण्याकडे लक्ष द्या. परिसरातील जैवविविधता वापर करून घ्या. जुन्या पद्धतीने सण साजरे करत पर्यटकांना सहभागी करून घ्या.’’

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘‘केंद्रात विविधता व वेगळेपणा असणे आवश्यक आहे. केंद्रावर औषधी वनस्पती लागवड, मत्सपालन आदी प्रकल्प उभारावेत. यातून वेगळे अर्थाजन होण्यास मदत होणार आहे. तालुक्याच्या नैसर्गिक संपदेचा अभ्यास करून कृषी पर्यटन केंद्रे उभारून तालुक्याची वेगळी ओळख निर्माण करावी.’’

Agrowon Samvad
Agri Tourism : कोकणात १६८ कृषी पर्यटन केंद्रांना मान्यता

डॅा. राजेंद्र सरकाळे म्हणाले, की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यासांठी वेगवेगळ्या सर्वाधिक ७५ योजना राबविणारी बँक आहे. कृषी पर्यटन निर्मितीसाठी कर्जपुरवठा करणारी एकमेव बँक असून जिल्ह्यातील एकूण पर्यंटनापैकी ६५ टक्के कृषी पर्यटनास कर्ज पुरवठा करणारी बँक आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक संपदेचा वापर करून दर्जेदार पर्यटन केंद्र उभारावी यासाठी लागणारी आर्थिक सहाय्य बँक करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी आंनद कृषी पर्यटन केंद्राचे आनंदराव शिंदे यांनी पर्यटन केंद्र उभारणी व व्यवसाय बारकावे, योगेश ढाणे यांनी अॅडव्हेंचर खेळणी तर प्रणय जाधव यांनी बँकेच्या योजना व अनुदानबाबतची माहिती दिली. विभागीय विकास अधिकारी सुधाकर देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. अॅग्रोवन सहायक व्यवस्थापक महेश बेले यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com