Farmer Demand
Farmer DemandAgrowon

Farmer Demands : नाफेडने सोयाबीन खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Soybean Procurement : सोयाबीनला बाजारपेठेत दर कमी झाला आहे. यामुळे हमीभाव व बाजारातील दरात सुमारे हजार रुपयांचा फरक असून शेतकऱ्यांचे एकरी पाच ते १० हजारांपर्यंत नुकसान होत आहे.
Published on

Akola News : सोयाबीनला बाजारपेठेत दर कमी झाला आहे. यामुळे हमीभाव व बाजारातील दरात सुमारे हजार रुपयांचा फरक असून शेतकऱ्यांचे एकरी पाच ते १० हजारांपर्यंत नुकसान होत आहे.

त्यामुळे सोयाबीनची खरेदी नाफेडमार्फत सप्टेंबर २०२४ पूर्वी सुरू करावी, अशी मागणी मूर्तिजापूर येथील विविध संघटनांनी केली. याबाबत खासदार अनुप धोत्रे यांना निवेदन देत शासनाकडे मागणी केली.

Farmer Demand
Soybean Procurement : किमान आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदी सुरू करा

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाफेडची खरेदी सुरू करण्यासाठी नाफेड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेला निर्देश दिले जावेत. हमीभाव व बाजारातील खरेदीचा दर यात क्विंटलमागे हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे.

Farmer Demand
Cotton, Soybean Anudan : कापूस, सोयाबीन अनुदानासाठी आता सातबाराची अट; शेतकऱ्यांचा प्रश्न मिटणार का ? 

एकरी पाच ते १० क्विंटलची उत्पादकता गृहीत धरली तर येत्या काळात शेतकऱ्यांचे एवढ्याच हजारांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी नाफेडने तातडीने पुढील महिन्यापासूनच खरेदी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली.

प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे, अरुण बोंडे यांनी खा.धोत्रे यांना निवेदन दिले. या निवेदनावर जनमंचाचे मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष प्रा.सुधाकर गौरखेडे, प्रमोद राजंदेकर, सेवकराम लहाने, पंकज कांबे, मुन्ना नाईकनवरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com