Khilar Bull Reels: खिलार बैलांच्या रिल्स ‘टॉप’वर

Viral Reels Update: ग्रामीण भागात अलीकडच्या काळात खिलार बैलांच्या रिल्सचा ट्रेंड वाढला आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्याही लाखोंनी वाढल्याने अशा रिल्स निर्मितीचे प्रमाण वाढत आहे.
Khilar Bull
Khilar BullAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: ग्रामीण भागात अलीकडच्या काळात खिलार बैलांच्या रिल्सचा ट्रेंड वाढला आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्याही लाखोंनी वाढल्याने अशा रिल्स निर्मितीचे प्रमाण वाढत आहे. खिलार बैल हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध गोवंश आहे. खिलार बैलांचा रुबाबदार देह, त्यांचे काळे खूर, लांबसडक शेपूट आणि त्यांची चाल यामुळे ते खूप आकर्षक दिसतात. त्यांची ही सौंदर्यदृष्ट्या आकर्षक वैशिष्ट्ये रिल्समध्ये प्रभावीपणे दाखवली जाते.

सोशल मीडियामुळे ही ओळख केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता, देशभरात आणि परदेशातही पोहोचत आहे. बैलगाडा शर्यतींमध्ये खिलार बैलांचा दबदबा असतो. शर्यतींवर बंदी असताना त्यांची पैदास कमी झाली होती. आता शर्यती पुन्हा सुरू झाल्याने त्यांची मागणी वाढली आहे. त्यांच्या शर्यतीतील पराक्रमाचे, वेगाचे रिल्स खूप पसंतीस उतरत आहेत.

Khilar Bull
Khilar Bull : खिलार बैलांचं गाव सलगरे, एक एक खोंड पारणं फेडतील

खिलार बैल हा शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग मानला जातो. शेतीकामात त्यांचा मोलाचा वाटा असतो. शेतकरी आपल्या बैलांवर मुलांप्रमाणे प्रेम करतात. या भावनिक नात्याचे आणि त्यांच्या संगोपनाचे अनेक हृदयस्पर्शी रिल्सद्वारे दाखविले जात आहेत. या बैलांची पैदास आणि संगोपनासाठी शेतकरी मेहनत घेतात. या महागड्या आणि जातिवंत बैलांचे रिल्स, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांची देखभाल यामुळे अनेकांना कुतूहल वाटत असल्याने ते व्हायरल होत आहेत.

Khilar Bull
Indigenous Khilar Rearing : शर्यतीच्या खोंडांसाठी सलगरे सर्वदूर प्रसिद्ध

खिलार बैलांचे रिल्स हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून, त्यातून महाराष्ट्राची संस्कृती, शेती आणि पशुधनाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रभावी मार्ग बनला आहे. खिलार बैल रिल्स ट्रेंड हा सोशल मीडियावर एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि डिजिटल घटना म्हणून उदयास आला आहे. ट्रेंडिंग ऑडिओ, लोकप्रिय मराठी गाणी आणि डीजे रीमिक्सवर आधारित असतात. #bailgadasharyat, #khillar, #viral, #trending, #khillarMaharashtrachiShaan यांसारख्या हॅशटॅगचा व्यापक वापर या ट्रेंडची पोहोच वाढवत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील नव्या पिढींमध्ये खिलार बाबतचे आकर्षण वाढत आहे. गोठ्यात किती किमती बैल आहे, यावरही प्रतिष्ठा ठरत आहे. यामुळे लाखो रुपये देवून जातिवंत बैल खरेदी करण्यासाठी अहमिका लागली आहे.
नीतेश ओझा, गोपालक
शर्यतीबरोबर प्रतिष्ठा म्हणूनही जोपासना होताना दिसते. रिल्समुळे बैलांची माहितीची सहज देवाण-घेवाण होताना दिसते. शर्यतीमुळे खिलारला मोठे ग्लॅमर आले आहे.
ऊर्मिला गायकवाड, शर्यत शौकीन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com