Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

CM Conrad Sangma : मेघालयातील खासी जैंतिया हिल्समध्ये वादळ आणि पाऊसाने कहर केला असून शेकडो लोक बेघर झाले आहेत.
Storm Hits Meghalaya's
Storm Hits Meghalaya'sAgrowon

Pune News : मेघालयातील खासी जैंतिया हिल्स प्रदेशात मुसळधार पावसासह वादळाने अनेक गावांत कहर केला आहे. येथील १३ गावांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून सुमारे ४०० हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. यामुळे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांनी या नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त लोकांना त्वरित मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

मेघालयातील खासी जैंतिया हिल्समध्ये चक्रीवादळामुळे रविवारी मोठे नुकसन झाले आहे. येथे १३ गावांत सुमारे ४०० हून अधिक लोकांना आपत्तीचा फटका बसला आहे. यादरम्यान प्रभावित झालेल्या खासी जैंतिया हिल्समधील लोकांच्या मदतीला प्रशासन धावले असून सध्या येथे मदत कार्य सुरू आहे. तर आयएमडीने पुढील ४८ तासांत पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्याने मुख्यमंत्री संगमा यांनी लोकांना धीर देताना सरकार मदत करेल असे आश्वासन दिले आहे.

Storm Hits Meghalaya's
Jammu-Kashmir Landslide : मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; भूस्खलनमुळे अनेक घरे कोसळली

मुख्यमंत्री संगमा यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. संगमा म्हणाले की, "राज्याच्या काही भागात जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाला तातडीने मदत पाठवण्याच्या सुचना केल्या आहेत. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासन देखील बाधित लोकांना मदतीसाठी युद्धपातळीवर काम करत आहे.

यावेळी पीटीआयला एका वरिष्ठ आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले की, "मेघालयातील खासी जैंतिया हिल्स प्रदेशातील किमान १३ गावांमधील किमान ४२७ लोकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. या १३ गावातील घरे पडली आहेत. तर काहींचे अंशतः नुकसान झाले आहे.

Storm Hits Meghalaya's
Unseasonal Rain : अवकाळी पावसासह गारपिटीचा पिकांना तडाखा

जिल्हा उपायुक्तांना सतर्क राहण्याच्या आणि आवश्यकतेनुसार मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती गृह विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच हवामान खात्याने पुढील ४८ तासांत पुन्हा मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने प्रशासन अलर्टवर आहे. जर ४८ तासांत पुन्हा मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झालाच तर आधीच प्रभावित झालेल्या लोकांची स्थिती आणखी बिकट होण्याची भीती गृह विभागाच्या एका अधिकाऱ्याने वर्तवली आहे.

यादरम्यान बाधित १३ गावांना मदत पोहचवण्यासाठी स्थानिक अधिकारी मदतगार संस्थांशी समन्वय साधत आहेत. वादळामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांसाठी तात्पुरता निवारा उभारला जात आहे. याव्यतिरिक्त, आपत्ती दरम्यान जखमी झालेल्यांना वैद्यकीय मदत देण्यासाठी वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत ती सध्या आपत्ती स्थळांवर हजर आहेत. तर प्रशासनाकडून बाधित भागात पूर्वस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com