Unseasonal Rain : अवकाळी पावसासह गारपिटीचा पिकांना तडाखा

Hailstorm Crop Damage : अकोला, बुलडाण्यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत सोमवारी (ता. २६) वादळी वारऱ्यास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा तडाखा दिला.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Akola News : अकोला, बुलडाण्यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत सोमवारी (ता. २६) वादळी वारऱ्यास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा तडाखा दिला. यामुळे हजारो हेक्टर रब्बी, भाजीपाला पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. ज्वारी, बाजरी, गहू ही पिके जमीनदोस्त झाली. संत्रा, चिकू आंबा बागांत फळगळ झाली. रब्बीच्या एन काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

अकोला, बुलडाणा जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर्णा नदी लगत नांदुरा, जळगाव जामोद या तालुक्यांतील काही गावात जोरदार पाऊस व सोबत बोरांच्या आकारांच्या गारा पडल्या. त्यानंतर सायंकाळी सर्वत्र पावसाने जोर धरला. अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत या पावसाने हजेरी दिली. अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक २८.५ मिमी पाऊस झाला.

Crop Damage
Unseasonal Rain : बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा

तसेच मूर्तिजापूरमध्ये २५.६, बाळापूर १६.८, अकोला ५.५, अकोट ३.९, बार्शीटाकळी ४.८, पातूर येथे ३.९ पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातही सर्वच तालुक्यांत पाऊस झाला. त्यासह गारपीट झाल्याने नुकसान झाले. संग्रामपूर, जळगाव जामोद, देऊळगावराजा, नांदुरा, शेगाव तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. संग्रामपूर तालुक्यात संत्रा बागांना मोठा फटका बसला. वादळामुळे सुनगावमध्ये झाडे उन्मळून पडली.

लाडणापूर, सोनाळा भागांत झाडांवरील फळे गळाली. एकलारा भागात जोरदार गारपिटीने टरबूज-खरबूज क्षेत्रातील वेलांचे नुकसान झाले. ज्वारीचे पीक जमीनदोस्त केले. याचा मोठा फटका ज्वारी उत्पादनावर होणार आहे. दरम्यान, रविकांत तुपकर यांनी मंगळवारी (ता. २७) शेगाव तालुक्यात पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना १०० टक्के भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.

अकोला, बुलडाण्यातील स्थिती.

- गहू, मका, रब्बी ज्वारीचे पीक जमीनदोस्त

- काढणीसाठी तयार असलेला हरभरा भिजला

- संत्रा बागांमध्ये फळगळती

- कांदा पिकाची पात मोडून पडली

- कांदा बीजोत्पादन क्षेत्रात गेंद तुटले

- पपईच्या बागांमध्ये झाडे तुटली

- मोहरलेल्या, फळे लागलेल्या आंब्याचे नुकसान

- टरबूज, खरबूज शेतीलाही तडाखा, वेल तुटले

Crop Damage
Unseasonal Rain : मुसळधार पाऊस अन् गारपिटीने राज्यात रब्बी पिकांना फटका, फळबागांचेही मोठे नुकसान

जालना, संभाजीनगर जिल्ह्यांतही तडाखा

जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद अंबड, शहागड, अंकुशनगर, गोंदी, वडिगोद्री, टेंभुर्णी व पारधसह अन्य काही गावांत सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते, सावंगी अवघडराव, सेलूद, गव्हाण संगमेश्वर, पिंपळगाव बारव, नळणी बु. सजा, सुरंगळी सजा वाकडी आदी ठिकाणी तसेच जाफराबाद तालुक्यातील आंबेगाव टेंभुर्णी, गणेशपूर, काळेगाव, गोंदन खेडा, नळविहीरा, तपोवन आदी ठिकाणीही गारपीट व वादळी पाऊस झाला.

वादळामुळे काही घरांवरील पत्रे उडाले. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. रब्बीतील हरभरा, ज्वारी, गव्हासह फळ पिकातील पपई, आंबा, चिकू आदी पिकांना वादळी पावसाचा व गारपिटीचा फटका बसला.

छत्रपती संभाजीनगर तालुका, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड तालुक्यांमधील काही गावांत वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. नागद, नागापूर, माणिकनगर, पिरबावडा, आळंद, सायगव्हाण परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस व काही ठिकाणी तुरळक गाराही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. फुलंब्री तालुक्यातील धानोरा येथे वीज पडून बैलाचा मृत्यू झाला.

जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी सकाळीच प्रत्यक्ष बांधावर दाखल झाले. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, तपोवन (गोंदन), आंबेगाव, गणेशपूर आदी ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीबाबत तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक यांचे पथक स्थापन करून अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

वीज पडून दोघांचा मृत्यू

भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यात एका शेतकरी महिलेचा समावेश आहे. शिवाजी गणपत कड (वय ३८, रा. सिपोरा बाजार) व अर्चना ऊर्फ पल्लवी विशाल दाभाडे (२१, रा. कुंभारी) अशी मृतांची नावे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com