Ratnagiri News : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात भात व नाचणी पिकांचा समावेश केला आहे. आतापर्यंत २ हजार १२७ शेतकऱ्यांनी ४७७.५७ हेक्टरवरील पीकविमा उतरवला आहे. त्यासाठी १५ जुलैपर्यंत अंतिम मुदत असून, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी जालिंदर पांगरे यांनी केले.
शेतकऱ्यांना १ रुपयात अर्ज भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. भात पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी ५० हजार रुपये, तर नाचणीसाठी २० हजार आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे हंगामाच्या शेवटी उत्पन्नात घट आल्यास नुकसानीचा लाभ दिला जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत अनियमित आणि ढगफुटीसारख्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना विमा लाभ मिळत आहे. त्यामुळे विमा उतरविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यंदा जिल्ह्यातील २ हजार १२७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. त्यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. लांजा तालुक्यात सर्वांत कमी शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यात विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का अधिक होता.
दरम्यान, या योजनेचा पीकविमा हप्ता भरण्याची मुदत सोमवारपर्यंत (ता. १५) आहे. आपले सरकार सेवा केंद्र, बॅंक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने पीकविमा भरावा. अधिक माहितीसाठी कृषी सहायक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पांगरे यांनी केले.
तालुका शेतकरी विमा क्षेत्र (हेक्टर)
मंडणगड १३७ ३७.२३
खेड ९२० १२९.९१
दापोली २३१ ६५.६२
गुहागर ५२ २३.३०
चिपळूण १८६ ७२.८१
संगमेश्वर १५९ ४९.०९
रत्नागिरी ६८ ३७.२३
लांजा ५६ १५.८३
राजापूर ३१८ ५१.२०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.