Kharif Sowing : खरीप पेरण्या २४ टक्क्यांपर्यंत

Agriculture Sowing Update : गेल्या खरिपाच्या तुलनेत यंदा आतापर्यंतच्या झालेल्या पेरण्या दमदार असून सोयाबीन, कपाशी, तूर, मका या प्रमुख नगदी पिकांचा पेरा अंतिम टप्प्याकडे जात आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Pune News : गेल्या खरिपाच्या तुलनेत यंदा आतापर्यंतच्या झालेल्या पेरण्या दमदार असून सोयाबीन, कपाशी, तूर, मका या प्रमुख नगदी पिकांचा पेरा अंतिम टप्प्याकडे जात आहे.आतापर्यंत राज्यात २४ टक्क्यांच्या आसपास पेरा झाला आहे.

दुसऱ्या बाजूला, भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. कृषी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्याचे सरासरी खरीप पेरणी क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत ३४ लाख हेक्टरपर्यंत पेरा झालेला आहे. खरिपाच्या पहिल्याच टप्प्यात पावसाचा खंड काही दिवस जाणवला असला तरी कडाक्याचे ऊन, मोड किंवा उगवणीला अडचणी अशा समस्या उद्भवलेल्या नाहीत.

Kharif Season
Agriculture Sowing : बीड जिल्ह्यात जवळपास निम्मी पेरणी उरकली

त्यामुळे पेरण्या वेळेत व जोमाने होत आहेत. कृषी विभागाने यंदा घेतलेल्या बीजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणी, घरच्या बियाण्यांचा वापर, बीबीएफ वापर या मोहिमांचा चांगला उपयोग झालेला आहे. घरच्या बियाण्यांच्या वापराबाबतच्या मोहिमांमुळे बियाणे खरेदीवर यंदा ताण आला नाही, असे निरीक्षण कृषी विभागाचे आहे. “राज्यात यंदा ५० लाख हेक्टरवर सोयाबीनचा; तर ४२ लाख हेक्टर कपाशीचा पेरा अपेक्षित आहे.

कपाशी बियाण्यांचा पुरवठा यंदा पुरेसा व वेळेत झाला. काही जिल्ह्यात ओरड झाली; परंतु ती केवळ विशिष्ट वाणांपुरती मर्यादित होती. राज्याला यंदा ३८ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज होती. त्याहून जास्त बियाणे शेतकऱ्यांनी तयार केले. तसेच, बियाणे कंपन्यांनीदेखील मजबूत पुरवठा केला. त्यामुळे सोयाबीन बियाण्यांची टंचाई दिसून आली नाही,” असे कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Kharif Season
Agriculture Sowing : नाशिक जिल्ह्यात अवघ्या ६ टक्के खरीप पेरण्या

राज्यात यंदा १५ लाख हेक्टरवर क्षेत्रात भात पेरला जाईल. चांगला पाऊस असल्याशिवाय भाताचा पेरा करता येत नाही. मात्र, रोपवाटिकांची कामे सुरळीत चालू आहेत. पाऊस झालेल्या भागातील रोपवाटिका तरारल्या आहेत. पुनर्लागवडीच्या कालावधीत चांगला पाऊस झाल्यास यंदा भाताचे चांगले उत्पादन होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

राज्यात जूनमध्ये सरासरी २०८ मिलिमीटर पाऊस होतो. गेल्या वर्षी आतापर्यंत १११ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा १८ दिवसात १४१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत १५६ तालुक्यांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अर्थात, अजूनही १७ तालुक्यांत २५ टक्क्यांपेक्षा कमी; तर ६१ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

खरीप पेरण्यांची अंदाजे स्थिती (२१ जूनअखेर)

पीक सरासरी क्षेत्र गेल्या वर्षीचा पेरा चालू वर्षाचा पेरा (कंसात यंदाची टक्केवारी)

धान १५०८३७४ ६१८५० ६८५०५ (५)

खरीप ज्वारी २८८६१५ ९ ८८५६ (३)

बाजरी ६६९०८९ १२ ७७६९३ (१२)

नाचणी ७८१४९ १२३२ २७०७ (३)

मका ८८५६०८ ११९४ २८८१७६ (३३)

तूर १२९५५१६ ३०६ २२३४०१ (१७)

मूग ३९३९५७ २१ ६५६७७ (१७)

उडीद ३७०२५२ ३९ ६५१३६ (१८)

भुईमूग १९१५७५ १४४ ३७२९२ (१९%)

तीळ १५१६२ ० २६९ (२)

कारळे १२४६० ० ११४ (१)

सूर्यफूल १३७८० ० २०१५(१५)

सोयबीन ४१४९९१२ ७२५ ११५४०७६ (२८)

कापूस ४२०११२८ १३१६५० १३८३३३७(३३)

सर्व आकडे अंदाजे व हेक्टरमध्ये आहेत.

गेल्या खरिपात याच कालावधीत राज्यात अवघा दोन लाख हेक्टरवर पेरा झाला होता. यंदा पेरा ३३ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. चालू खरिपात अन्नधान्याचे उत्पादन चांगले होण्याचे संकेत आहेत.
विनयकुमार आवटे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com