Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Kharif Sowing : माजलगावात ६१ हजार हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी

Kharif Season 2025 : माजलगाव तालुक्यात खरीप हंगामाचे ७८ हजार ७७८ हेक्टर खरीप पेरणीलायक क्षेत्र आहे. मागील वर्षीच्या खरिपात ६४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.
Published on

Beed News : तालुक्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात खरिपाची पेरणी होणार असून कृषी विभागाच्या प्रस्तावित आकडेवारीनुसार तालुक्यात एकूण ६१ हजार ६२० हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

माजलगाव तालुक्यात खरीप हंगामाचे ७८ हजार ७७८ हेक्टर खरीप पेरणीलायक क्षेत्र आहे. मागील वर्षीच्या खरिपात ६४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी प्रस्तावित पेरणीची आकडेवारी तालुका कृषी कार्यालयाने जाहीर केली असून एकूण ६१ हजार ६२० हेक्टरवर खरीप हंगामातील बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांची लागवड शेतकरी करणार आहेत.

Kharif Sowing
Kahrif Season : खरिपासाठी काटेकोर नियोजन करा

कधी नव्हे तर यावर्षी मे महिन्यातच अवकाळी तसेच मॉन्सूनपूर्व पाऊस बरसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागला. परंतु, आता आठ ते दहा दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतींची कामे आटोपली असून काही भागात आजही ही कामे सुरूच असल्याचे चित्र आहे.

Kharif Sowing
Kahrif Seed Supply : हिंगोली जिल्ह्यात खरिपाच्या २७ हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा

दरम्यान, पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतिक्षा असून पेरणीयोग्य पाउस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

गतवर्षीचा पेरा (हेक्टरमध्ये)

बाजरी ३५७

तूर २ हजार ४३४

मुग ३०९

उडीद १६

सोयाबीन ३३ हजार १२३

कापुस २७ हजार ८३२

यंदाचे प्रस्तावित क्षेत्र

बाजरी २५०

तुर ३०००

मुग ३५०

उडीद १६

सोयाबीन ३० हजार

कापुस २८ हजार

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय लागवड करू नका. विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये, सोयाबीनचे घरचे बियाणे असेल तर उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी व बियाणे बीज प्रक्रिया करूनच पेरावे.
- गणेश बादाडे, तालुका कृषी अधिकारी, माजलगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com