Kharif Season : खरिपात तूर, कपाशी, हळद क्षेत्रवाढीचा अंदाज

Kharif Agriculture : ‘‘हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) खरिपात ३ लाख ९७ हजार ६४५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित केली आहे. यंदा तूर, कपाशी, मूग, उडीद तसेच हळदीच्या क्षेत्रात वाढ गृहित धरण्यात आली आहे,’’
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Hingoli News : ‘‘हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) खरिपात ३ लाख ९७ हजार ६४५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित केली आहे. यंदा तूर, कपाशी, मूग, उडीद तसेच हळदीच्या क्षेत्रात वाढ गृहित धरण्यात आली आहे,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.

Kharif Season
Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

जिल्ह्यात २०१९ ते २०२३ या पाच वर्षांतील हळदीसह खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र ४ लाख ३ हजार ४७२ हेक्टर आहे. गतवर्षी जिल्ह्यात हळदीसह खरीप पिकांची एकूण ३ लाख ८१ हजार ८९० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ३ लाख ९७ हजार ६४५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात किंचित घट अपेक्षित असून हेक्टरी १४ क्विंटल ३२ किलो उत्पादकता प्रस्तावित आहे.

Kharif Season
Kharif Planning : खरिपासाठी निविष्ठांची पुरेशी उपलब्धता ठेवा

कपाशीच्या क्षेत्रात दीड हजार हेक्टरने वाढ होऊन ३२ हजार ८६० हेक्टरवर लागवड तर रुईचा उतार हेक्टरी ३ क्विंटल ७७ किलो प्रस्तावित आहे. तुरीच्या क्षेत्रात अडीच हजार हेक्टरची वाढ गृहित धरुन ३६ हजार ७९९ हेक्टरवर पेरणी तर हेक्टरी ७ क्विंटल १७ किलो उत्पादकता, तर मुगाच्या क्षेत्रात २०० हेक्टरची वाढ गृहित धरुन ५ हजार ९१४ हेक्टरवर पेरणी, हेक्टरी ६ क्विंटल ५१ किलो उत्पादकता प्रस्तावित आहे.

हळद १० हजार हेक्टरने वाढ अपेक्षित

जिल्ह्यातील हळदीचे सरासरी क्षेत्र ४२ हजार ४२३ हेक्टर आहे. परंतु उत्पादकतेतील घट, कमी बाजारभाव, वाढलेला उत्पादन खर्च आदी कारणांनी परवडत नसल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात मोठी घट झाली. गतवर्षी जिल्ह्यात २४ हजार १७१ हेक्टरवर हळदीची लागवड होती. गतवर्षी जून अखेरपासून हळदीच्या दरात तेजी आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकरी परत हळद लागवडीकडे वळतील, असे गृहित धरुन यंदा ३४ हजार ५८८ हेक्टरवर हळद लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

हिंगोली जिल्हा तुलनात्मक खरीप क्षेत्र स्थिती (हेक्टर)

पीक २०२३ पेरणी क्षेत्र २०२४ प्रस्तावित क्षेत्र

सोयाबीन २७६८४४ २७७८९०

कपाशी ३१३४७ ३२८६०

तूर ३४२६६ ३६७९९

मूग ५७०१ ५९१४

उडिद ४५१० ५४६१

ज्वारी ३२६७ ३२६७

बाजरी १९ ११२

मका ४५९ ५९३

तीळ ७२ ७२

कारळ ३० ३०

हळद २४१७१ ३४५८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com