Moong Udid Sowing: खरीप मूग, उडीद, ज्वारीचा पेरा जेमतेम

Vidarbha Agriculture: खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांतील काही भागांत अजूनही पेरण्या सुरू असून, लहरी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीक निवडीवर मोठा परिणाम झाला आहे.
Moong Udid Sowing
Moong Udid SowingAgrowon
Published on
Updated on

Akola News: खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांतील काही भागांत अजूनही पेरण्या सुरू असून, लहरी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीक निवडीवर मोठा परिणाम झाला आहे.

विशेषतः हंगामाच्या सुरुवातीस कमी पाऊस झाल्याने व नंतरही अनियमित पाऊस पडल्याने पारंपरिक मूग, उडीद व ज्वारी यांसारख्या कोरडवाहू पिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, या पिकांची लागवड सरासरी क्षेत्रापेक्षा कमी राहिली आहे.

Moong Udid Sowing
Moong Urid Sowing: खानदेशात उडीद, मूग पेरणी होतेय कमी

हंगामाच्या सुरुवातीला, विशेषतः जून महिन्यात पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे पहिल्या पेरणीची योग्य वेळ गेली आणि अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या. परिणामी, लवकर उगम होणारी व पावसाच्या अनिश्‍चिततेला तोंड देऊ शकणारी पिके शेतकऱ्यांनी निवडली होती.

Moong Udid Sowing
Moong Cultivation : मूग, उडीद लागवडीचे तंत्र

यंदा सोयाबीन, कपाशी या दोन्ही प्रमुख पिकांकडे विभागनिहाय कल कमी अधिक राहिला. बुलडाणा जिल्ह्यात यंदा मक्याने ४० हजार हेक्टरचा विक्रमी पल्ला गाठला आहे. त्यामुळे सोयाबीन व कपाशीचे क्षेत्र कमी झाले. अकोल्यातही कपाशीच्या क्षेत्रात घट झाली. या भागात कोरडवाहू पट्ट्यात मूग-उडदाची लागवड केली जाते.

परंतु पावसाच्या असमतोलपणामुळे मूग व उडीद यांसारखी डाळवर्गीय पिकांची लागवड जेमतेम दिसून येत आहे. पश्‍चिम विदर्भात कुठल्याच जिल्ह्यात या पिकांनी सरासरीही गाठलेली नाही. सोबतच ज्वारीसारखे पीकसुद्धा मागे पडले.

खरिपातील कोरडवाहू ज्वारीच्या लागवडीत घट झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून दिसून येत आहे. काही भागांत अजूनही उशिराची पेरणी सुरू आहे. सध्या लागवडीचा सरासरी आकडा हळूहळू वाढत आहे. काही ठिकाणी सततच्या पावसाने पेरणीलाही वाफसा मिळालेला नाही.

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये पाऊस जास्तीत जास्त प्रमाणात असल्यामुळे भरपूर गावशिवार मोठ्या प्रमाणात पेरणी शिल्लक आहे. या आठवड्यात वाफसा तयार झाला नाही तर शेकडो एकर शेती नापेर राहू शकते. माझ्या सुदी गावातील तर ७० टक्क्यांवर शेती अद्यापही पेरणी व्हायची आहे आणि या दोन दिवसांत परत पाऊस आला तर शेती नापेर राहील. 
- विनोद पाटील, शेतकरी, सुदी, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com