Kharif Sowing : खरिपाची ९५ हजार हेक्टरवर पेरणी

Kharif Season : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण खरीप पेरणीयोग्य ६ लाख ८४,७१६ हेक्टर क्षेत्रापैकी १४ जून अखेर ९५ हजार ७६९ हेक्टरवर पेरणी झाली होती.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण खरीप पेरणीयोग्य ६ लाख ८४,७१६ हेक्टर क्षेत्रापैकी १४ जून अखेर ९५ हजार ७६९ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामध्ये सर्वाधिक ७१,४२४ हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

यंदाच्या खरीप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ६८ हजार ९९९, पैठणमधील ८५,८७१, गंगापूरमधील ९३,७८३, वैजापूरमधील १ लाख १९४५८, कन्नडमधील ९५,८००, खुलताबादमधील ३१ हजार ९२२, सिल्लोडमधील ९४,८२८, सोयगावमधील ४१ हजार ७१२, तर फुलंब्रीतील ५२ हजार ३४३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

Kharif Sowing
Kharif Season: खरीप आढावा बैठकीला अजूनही मुहूर्त नाही

या तालुकानिहाय प्रस्तावित क्षेत्रापैकी जिल्हाभरात १४ जून अखेरपर्यंत ९५ हजार ७६९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १४१५८, पैठणमधील १३५१८, गंगापूरमधील १६ हजार ३४६, वैजापूरमधील ६०५८, कन्नडमधील ७६४०, खुलताबादमधील ५३२९, सिल्लोडमधील १३०५४, सोयगावमधील ४५९८ तर फुलंब्रीतील १५०६८ हेक्टर पेरणी झालेल्या क्षेत्राचा समावेश होता.

सरासरी क्षेत्राच्या तुलनेत फुलंब्री तालुक्याने १४ जून अखेरच्या पेरणीत आघाडी घेतली होती तर वैजापूर तालुक्यात सर्वात कमी पेरणी झाली होती. पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये सोयाबीनची १३२८ हेक्टर गळीत धान्याची १७४२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. पावसाचे समसमान प्रमाण नसल्याने पेरणीतील आकडेवारीत कमी अधिकपणा दिसून येतो आहे.

Kharif Sowing
Kharif Season : करमाळ्यातील उत्तर भागात खरीप पेरणीला वेग

कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक

जिल्ह्यात यंदाच्या खरिपातील कपाशी पिकासाठी ३ लाख ९४ हजार ७७१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या ४२,१६१ हेक्टर क्षेत्रापैकी १२,३६५ हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड झाली आहे. पैठण तालुक्यात ६२,९१८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १२,३३७ हेक्टर, गंगापूर तालुक्यात ६० हजार ८१३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १४,५६१ हेक्टर, वैजापूर तालुक्यात ७१,६८५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३०३३ हेक्टर, कन्नड तालुक्यात ४८ हजार ४९२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४५२० हेक्टर, खुलताबाद तालुक्यात १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३८४६ हेक्टर, सिल्लोड तालुक्यात ४०,१९२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेस ६०८९ हेक्टर सोयगाव तालुक्यात २८ हजार ३९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४५१३ हेक्टर तर फुलंब्री तालुक्यात २५ हजार ७६६ हेक्टर सरासरी कपाशी क्षेत्राच्या तुलनेत १०,१६० हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड झाली होती.

गत आठवडाभरात झालेला पाऊस सारख्या प्रमाणात पडलेला नाही. मंडलनिहाय पावसाचे प्रमाण कमी अधिक आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com