Chemical Fertilizer Linking: लिंकिंगशिवाय मिळेनात रासायनिक खते

Farmer Issue: डीएपी खतासोबत सल्फर खताची लिंकिंग करणे शेतकऱ्यांना अधिक खर्च करायला भाग पाडत आहे. यावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून, कृषी विभागाने लिंकिंगविरोधी कायदेशीर कारवाईची चेतावणी दिली आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Akola News: खरीप हंगाम जवळ आला असून, शेतकऱ्यांनी आगामी काळाचे नियोजन म्हणून रासायनिक खतांचा साठा करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खतासमवेत सल्फर खताची लिंकिंग केली जात असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे शासकीय यंत्रणा, अशा प्रकारच्या लिंकिंगबाबत शेतकऱ्यांनी तक्रार दिल्यास, कायदेशीर कारवाई करू, असे आश्‍वासन शेतकऱ्यांना देत आहेत.

आगामी हंगामात शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतांची अनेक शेतकरी आतापासून खरेदी किंवा बुकिंग करीत आहेत. मात्र असे करताना त्यांना लिंकिंगचा मोठा फटका बसतो आहे. वाशीम जिल्ह्यातील विक्रेत्यांनी यापूर्वीच खत उत्पादक कंपन्यांनी सुरू केलेल्या लिंकिंगबाबत वरिष्ठांकडे लेखी निवेदन पाठवले आहे. हाच प्रकार अकोल्यातही सुरू असून, हंगामाच्या तोंडावर काही ठिकाणी शेतकऱ्यांना लिंकिंगला सामोरे जावे लागत आहे.

Fertilizer
India Fertilizer Sales: देशात खत विक्रीत नऊ टक्के वाढ

आधीच रासायनिक खतांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढलेल्या असल्याने उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. शिवाय दुसरीकडे हवामान बदलामुळे दरवर्षी पिकांची उत्पादकता कमी येत आहे. बाजारात शेतीमालाचे भावसुद्धा चांगले मिळत नाहीत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना नको असलेली रासायनिक खते माथी मारण्याचे प्रकार काही ठिकाणी होत आहेत.

विक्रेत्यांसमवेत वर्षानुवर्षे संबंध असल्याने शेतकरी तक्रार करायला पुढे येत नाहीत. मात्र दुसरीकडे हा प्रकार सुरू झाल्याने आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. गरज नसलेले खत खरेदी केल्याने त्याचा योग्य वापर होणार नाही पर्यायाने या खताचा अपव्ययच होईल. प्रशासनाने स्वतः पुढाकार घेत लिंकिंगचा हा अन्यायकारक प्रकार थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Fertilizer
Fertilizer Price : मागील वर्षी खत अनुदानात ६ टक्के घट; केंद्र सरकारचा प्लॅन काय?
मी डीएपी खताबाबत विविध ठिकाणी चौकशी केली व डीएपी खत खरेदी केले. बाजारात डीएपीचा दर १३५० रुपयांपर्यंत आहे. मात्र सल्फरची जवळपास ३०० रुपयांची बॅग घेण्याची सक्ती केली जात असल्याने आता डीएपी खताच्या बदल्यात १६५० रुपये खर्च करावे लागले. मला आवश्‍यकता असल्याने डीएपी घेतले. परंतु सल्फर खताचे काय करावे, हा प्रश्‍नच आहे. शिवाय ३०० रुपये अतिरिक्त खर्चही झाला.
खत खरेदीदार शेतकरी
अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २४) जिल्हा संनियंत्र समितीची सभा झाली. या वेळी कृषी निविष्ठा विक्रेते, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खत, बियाण्यांसमवेत कुठलीही लिंकिंग केली जाऊ नये. याबाबत कुठल्या प्रकारची तक्रार आल्यास संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिला आहे. तसे लेखी पत्रही दिले आहे. त्यामुळे जिल्हाभरात कुठेही लिंकिंग होत असेल तर तातडीने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे माहिती द्यावी.
डॉ. तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com