Kharif Preparation : पावसाने पूर्वमशागतीच्या कामात अडथळे

Kharif Season 2205 : खानदेशात चांगला पाऊस नसल्याने पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. परंतु दुसरीकडे अनेकांचे क्षेत्र पूर्वमशागतीविना पडून आहे.
Kharif Season 2025
Kharif Season 2025Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात चांगला पाऊस नसल्याने पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. परंतु दुसरीकडे अनेकांचे क्षेत्र पूर्वमशागतीविना पडून आहे. मध्येच पाऊस येत असल्याने काळ्या कसदार जमिनीत वाफसा नसल्याने ट्रॅक्टरने नांगरणी, रोटाव्हेटर करून शेत पेरणीयोग्य झालेले नाही.

खानदेशात ६ मे पासून पाऊस सुरू झाला. सर्वत्र जोरदार किंवा चांगला पाऊस नव्हता. परंतु वादळी वारे, गारपीट यामुळे तिन्ही जिल्ह्यांत सुमारे पाच ते साडेपाच हजार हेक्टरवरील केळी, मका, कांदा, बाजरी, पपई, भाजीपाला पिके, भुईमूग आदींची हानी झाली. या संकटातून मार्ग काढत शेतकऱ्यांची पीक काढणी, मळणीची धावपळ सुरू होती.

Kharif Season 2025
Kharif Season Preparation : मॉन्सूनपूर्व पावसामुळे सांगलीत पूर्व मशागती सुरू

त्यात शेतात शेणखत वाहतूक, चारा वाहतुकीचे कामही गतीने सुरू होते. अशात जून उजाडेपर्यंत अनेकांची खरिपात पेरणीसाठी शेती तयार नाही. त्यात या महिन्यातही विविध भागांत रोज मध्यम ते हलका पाऊस येत आहे. मागील तीन-चार दिवसांत धुळ्यातील धुळे, साक्री, शिरपूर, जळगावातील धरणगाव, एरंडोल, जळगाव, चोपडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागांत पाऊस झाला.

यामुळे शेती मशागतीची कामे ठप्प आहेत. कारण वाफसा नाही. वाफसा होण्यासाठी किमान तीन दिवस सूर्यप्रकाशित वातावरण हवे आहे. परंतु रोज सकाळी नीरभ्र वातावरण असते. दुपारी ढगाळ वातावरण तयार होते. वारे व सायंकाळी मध्यम पाऊस, असा अनुभव जळगाव, धरणगाव, एरंडोल भागातील शेतकरी घेत आहेत.

Kharif Season 2025
Kharif Preparation : मलकापूर तालुक्यात खरीप हंगामाची तयारी

अनेकांच्या क्षेत्रात केळी काढणी होऊन खांब, फुटवे उभे आहेत. या क्षेत्रात वाफसा नाही. कारण केळीचे नियमित सिंचन करावे लागत असल्याने ओलावा खोलपर्यंत आहे. त्यात मशागतीचा प्रयत्न केल्यास ट्रॅक्टरची चाके रुतणे, शेत कडक होणे असा प्रकार होतो.

या कामासाठी दोन ते चार दिवस कालावधी सूर्यप्रकाशित वातावरण तयार झाल्यानंतर लागतो. अनेकांचे क्षेत्र नांगरून पडले आहे. शेत तापेल, असे नियोजन त्यामागे होते. पण पाऊस आल्याने हे नियोजन कोलमडले असून, नांगरणीचा खर्च वाया गेल्याची स्थिती आहे. अनेक शेतकरी उडीद, मूग, धैंचा पेरणीचे नियोजन करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com