Tunnel Water Supply : खडकवासल्याचे पाणी फुरसुंगीपर्यंत बोगद्यातून

Khadkawasala Dam : खडकवासला धरणातून शहर तसेच ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा केला जाणारा नवीन मुठा उजवा कालवा बंदिस्त करून बोगद्याद्वारे पाणी खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंत नेले जाणार आहे.
Khadakwasla Dam
Khadakwasla DamAgrowon

Pune News : खडकवासला धरणातून शहर तसेच ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा केला जाणारा नवीन मुठा उजवा कालवा बंदिस्त करून बोगद्याद्वारे पाणी खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंत नेले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.

‘‘अनेक ठिकाणी कालव्याच्या बाजूला पाटबंधारे विभागाची मोठ्या प्रमाणात जागा आहे. तसेच कालवा बंदिस्त केल्यानंतरही जागा वाढत असल्याने या प्रकल्पासाठी या जागांचा व्यावसायिक वापर करण्याचा विचार सुरू आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Khadakwasla Dam
Ujani Water Stock : उन्हाळ्या आधीच उजनी कोरडं पडण्याची शक्यता ; धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठी

कुमार म्हणाले, ‘‘प्रकल्पासाठी सुमारे २२०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. वेगवेगळ्या माध्यमातून हा खर्च उभारण्याचे नियोजन सुरू आहे. हा बोगदा केल्याने सुमारे ३ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.

Khadakwasla Dam
Ujani Dam : उजनी पाणलोट क्षेत्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर?

हा कालवा शहराच्या मध्य भागातून जात आहे. त्यामुळे महापालिका आणि पाटबंधारे विभाग हा प्रकल्प संयुक्त स्वरूपात राबविणार आहे. त्यामुळे महापालिकेने या कालव्याचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.

त्यानुसार, केलेल्या सर्वेक्षणात कालव्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात जागा आहेत. त्याचा व्यावसायिक वापर केल्यास मोठा निधी मिळेल. त्यामुळे प्रकल्पासाठी या जागा महत्त्वाच्या ठरतील. याबाबत पुढील बैठकीत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com