Karvand Market : डोंगरची काळी मैना बाजारात दाखल

Karvand Production : डोंगरची काळी मैना म्हणून नावलौकिक असलेले करवंद सध्या जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरावर बहरली आहेत.
Karvand Rate
Karvand RateAgrowon
Published on
Updated on

Karvand Production : डोंगरची काळी मैना म्हणून नावलौकिक असलेले करवंद सध्या जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरावर बहरली आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे या भागातील करवंदाच्या जाळीवर कमी प्रमाणात करवंदे दिसत आहेत. त्यामुळे दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात देखील करवंद दाखल झाले आहेत.

खवय्ये डोंगरावर जाऊन करवंदे खाण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, बेल्हे, बांगरवाडी, अणे, उंचखडक, आनंदवाडी, नळवणे, पेमदरा या भागात देखील मोठ्या प्रमाणात करवंदाच्या जाळ्या आहेत. तसेच जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सह्याद्री डोंगराच्या रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात करवंदाच्या जाळ्या आहेत. दरम्यान, दरवर्षीपेक्षा यावर्षी हा रानमेवा उशिरा दाखल झाला आहे.

Karvand Rate
Lemon Rate : लिंबू, शेवग्याच्या दरात वाढ तर कोबी, फ्लॉवर वांगी दरात घसरण

डोंगराळ भागात येणाऱ्या या करवंदांच्या जाळ्या (झाडे) या तालुक्याच्या पश्चिम भागात राहणारे आदिवासी बांधव शक्य होईल तेवढ्या राखतात. नंतर त्यापासून आपली उपजीविका भागवितात. मोठ्या प्रमाणात काटे असलेल्या या करवंदाच्या जाळ्यांमध्ये घुसून करवंद काढण्याचे अवघड काम आदिवासी समाजातील महिला करतात.

पहाटे लवकर जाऊन करवंदे काढली जातात. सकाळी ती बाजारात विक्रीसाठी आणली जातात. या भागात राहणारे आदिवासी बांधव करवंद म्हणजे डोंगराची काळी मैना असून, आम्हाला दोन घास देणारी देवता आहे, असे आवर्जून आदिवासी सांगतात.

किलोला ६० रुपयांचा दर

चैत्र महिन्यापासून या करवंदाच्या आंबट गोड जाळ्या पसरायला सुरुवात होते. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यानंतर हिरव्या रंगाची करवंदे झाडाला लागतात. हिरव्या करवंदाची चटणी देखील केली जाते. हिरवी करवंदे काळी झाल्यानंतर ती खाण्यास गोड लागतात. एका किलोसाठी ५० ते ६० रुपयांचा दर मिळत आहे. छोटे माप १५ ते २० रुपये, मोठे माप २५ ते ३० रुपये अशा पद्धतीने करवंदाची विक्री केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com