Mango Support Price: आंब्यासाठी भाव फरक योजना; कर्नाटक सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

Farmers Welfare: चालू हंगामात शेतकऱ्यांना आंब्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आंब्याला भाव फरक योजना जाहीर केली. तसेच अडीच लाख टन खरेदी केली जाणार आहे.
Mango Support Price
Mango Support PriceAgrowon
Published on
Updated on

Pune News: चालू हंगामात शेतकऱ्यांना आंब्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आंब्याला भाव फरक योजना जाहीर केली. तसेच अडीच लाख टन खरेदी केली जाणार आहे. बाजार हस्तक्षेप योजनेतून आंब्याला १६१६ रुपये भाव जाहीर करण्यात आला.

भाव पडल्यानंतर जाहीर झालेल्या भावाच्या २५ टक्क्यांपर्यंत मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कर्नाटकात बेंगळूर ग्रामीण, रामनगर, कोलार आणि चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यांमध्ये १ लाख ३९ हजार हेक्टरवर ८ ते १० लाख टन आंबा उत्पादन अपेक्षित आहे. आंबा हे या भागातील प्रमुख व्यावसायिक पीक आहे, परंतु गेल्या काही आठवड्यांत किमतीत मोठी घट झाली आहे.

Mango Support Price
Mango Orchard Management : अतिघन आंबा बागेत करावयाची कामे

यामुळे कर्नाटक सरकारने केंद्राकडे बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत खरेदीसाठी प्रस्ताव सादर केला होता.केंद्रीय कृषी मंत्रालयाने २ लाख ५० हजार टन आंब्याच्या खरेदीला मान्यता दिली. यासाठी बाजार हस्तक्षेप किंमत (MIP) १६१६ रुपये प्रति क्विंटल ठरवली आहे. किंमत पडल्यास बाजार हस्तक्षेप किंमतीच्या २५ टक्क्यांपर्यंत भरपाई मिळेल.

Mango Support Price
Mango Season : विक्रमगडमध्ये हापूस, केसर आंब्याची आवक वाढली

कर्नाटक राज्य आंबा विकास आणि विपणन महामंडळ, ही योजना राबवणारी नोडल एजन्सी असेल. या योजनेनुसार शेतकरी त्यांचा माल बाजार समित्या, थेट खरेदी केंद्रे,मान्यताप्राप्त आंबा प्रक्रिया युनिट्स येथे विकू शकतात. केंद्र सरकारच्या मंजुरीने, ही योजना बाजारातील किंमत कमी झाल्यास शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून राबवली जाणार आहे. 

शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागेल. प्रत्येक शेतकरी १०० क्विंटल पर्यंत भरपाईसाठी पात्र असेल, यासाठी जास्तीत जास्त ५ एकर जमिनीची मर्यादा ठेवली आहे. शेतकऱ्यांची माहिती जमीनीची-नोंद आणि UIDAI ने लिंक असलेल्या पीक डेटाद्वारे तपासली जाईल.

भाव फरक रक्कम थेट बँक खात्यात (DBT) जमा होईल.खरेदी बाजार समित्या,उप-आवार, डायरेक्ट खरेदी केंद्रे आणि मान्यताप्राप्त आंबा प्रक्रिया युनिट्सद्वारे होईल. मंडईचे सचिव व्यवहार नोंदवतील आणि दैनंदिन अहवाल सादर करतील. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com