Sopankaka Palkhi : संत सोपानकाका महाराज पालखीचे ३ जुलैला प्रस्थान

Palkhi Sohla 2024 : श्री संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा बुधवार (ता. ३ जुलै) रोजी श्री संत सोपानकाका महाराज मंदिरातून आषाढवारीसाठी पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे.
Palki Sohla
Palki SohlaAgrowon
Published on
Updated on

Pune News : श्री संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा बुधवार (ता. ३ जुलै) रोजी श्री संत सोपानकाका महाराज मंदिरातून आषाढवारीसाठी पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. तर २७ जुलै रोजी सासवड मुकामी येणार आहे, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख अॅड. त्रिगुण गोसावी यांनी दिली.

सासवड (ता. पुरंदर) येथे ३ जुलै रोजी संत सोपानदेव मंदिरात दिंडी प्रमुखांचे सत्कार, अभंग होऊन पादुका पूजन केले जाते. त्यानंतर पालखी ठेऊन मंदिरा प्रदक्षिणेने हजारो भाविकांच्या उपस्थितात देऊळवाड्यातून पालखी सासवड शहरातून जेजुरी नाका येथे आल्यानंतर सासवड नगरपालिकेच्या वतीने सर्वांचे स्वागत होऊन पालखी सोहळा प्रस्थान ठेवील. दुपारचा विसावा पिंपळे येथे होऊन रात्री सोहळा पांगारे मुकामी असणार आहे.

Palki Sohla
Palkhi Sohala : उद्या पंढरीत जमणार वैष्णवांचा मेळा; भक्तिरसात न्हाली पंढरी

पालखीचे सकाळी निघण्याचे ठिकाण, सकाळचा विसावा, दुपारचे जेवण, रात्री मुकाम, पुढील प्रमाणे :

तारीख --- ठिकाणे

४ जुलै --- पांगारे, पिलाणवाडी यादववाडी, परींचे, वीर, मांडकी मुक्काम.

५ जुलै --- मांडकी, जेऊर, नीरा, निंबूत, मुक्काम.

६ जुलै --- निंबूत, निंबूत छपरी, वागळवाडी, सोमेश्वरनगर बकऱ्यांचे गोल रिंगण मुकामी.

७ जुलै --- सोमेश्वर नगर, करंजी पूल, दहाफाटा, वडगाव निबाळकर, कोहाळे बुद्रूक, मुक्काम,

८ जुलै --- कोऱ्हाळे बुद्रूक, कठीणपूरल, पणदरे, माळेगाव बुद्रुक, गोलरिंगण मुक्काम

९ जुलै --- माळेगाव बुद्रूक पूर्वी हद्द, कोकाटे महाराज वस्ती, बारामती शारदा प्रांगण मुक्काम

१० जुलै --- बारामती शारदा प्रांगण मुक्काम, मोती बाग, पिंपळी गाव, बकरी रिंगण, भवानीनगर, सणसर, लासुर्णे मुक्काम

११ जुलै --- लासुर्णे, लालपुरू, कळम, निमसाखर, निरवांगी पालखी तळ मुक्काम,

१२ जुलै --- निरवांगी पालखी तळ, तरंगेवस्ती (रेडणी), लाखेवाडी, खरावढा, अकलूज मुक्काम.

Palki Sohla
Palkhi Sohla 2024 : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे २९ जूनला प्रस्थान

१३ जुलै --- अकलूज बाबरी पूल, नहाळुंग, श्रीपूर, माळखांबी, बोंडले मुक्कामी.

१४ जुलै --- बोंडले, बोडले, दुपारच्या विसाव्यानंतर संत सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज बंधू भेट सोहळा होऊन भंडीशेगाव पालखी तळ मुक्काम.

१५ जुलै --- भंडीशेगाव, दुपारी जेवण भंडीशेगाव, वाखरी मुक्काम.

१६ जुलै --- रोजी वाखरी पादुका जवळ उभे रिंगण होऊन आरती त्यानंतर श्री क्षेत्र पंढरपूर मुक्काम

परतीचा असा आहे प्रवास :

तारीख -- ठिकाणे

२१ जुलै --- पंढरपूर येथून निघून पादुका मंदिर भेंडी शेगाव भगत वस्ती, वाडी कुरोली रात्री मुक्काम,

२२ जुलै --- वाडी कुरोली, भोंडले, बोरगाव,

शिरपूर, एकवीस चारी बाबरीपूल, अकलूज मुक्काम,

२३ जुलै --- अकलूज, नीर निमगाव चौक खरा ओढा लाखेवाडी, रेडणी, कळम मुक्काम

२४ जुलै --- कळंम, कदम वस्ती, तावशी, डोरलेवाडी गावडे वस्ती, बारामती मुक्काम.

२५ जुलै --- बारामती माळेगाव बुद्रुक, को-हाळे बुद्रूक, वडगाव निंबाळकर, सोरटेवाडी मुक्काम.

२६ जुलै --- सोरटेवाडी, निंबूत छप्री, पिंपरी खुर्द, कामठवाडी, दौंडज मुक्काम,

२७ जुलै --- दौंडज जेजुरी एमआयडीसी चौक, साकुर्डे फाटा, यमाई शिवरी, सासवड मुक्काम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com