Cotton Cultivation : खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी वेगात

Cotton Production : खानदेशात पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवडीची तयारी पूर्ण झाली आहे. कापूस बियाणे विक्रेत्यांकडे दाखल झाले असून, त्याची विक्रीही सुरू आहे.
Cotton Crop
Cotton CropAgrowon

Jalgaon News : खानदेशात पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवडीची तयारी पूर्ण झाली आहे. कापूस बियाणे विक्रेत्यांकडे दाखल झाले असून, त्याची विक्रीही सुरू आहे. कापूस लागवडीत खानदेशात यंदा घट येईल, अशी स्थिती आहे. परंतु मोठी घट येणार नाही. बागायतदार शेतकऱ्यांनी क्षेत्र कमी करून अन्य पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे.

काहींनी लागवड न करण्याचे निश्‍चित केले आहे. यामुळे पूर्वहंगामी कापूस लागवड कमी होईल. एकूण बागायती कापूस लागवड दोन लाख हेक्टरवर असते. परंतु यंदा ही लागवड दोन ते अडीच हजार हेक्टरने कमी होईल. तर एकूण कापूस लागवड (Kapus Lagwad) खानदेशात पाच लाख ६५ हजार हेक्टरवर अपेक्षित असते. यंदा ही लागवड साडेपाच लाख किंवा पाच लाख ५४ हजार हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत.

Cotton Crop
Cotton Variety : एका कापूस वाणाची जादा दराने विक्री

पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी शेतात पूर्वमशागत कमाल शेतकऱ्यांनी केली आहे. त्यात प्रथम खोल नांगरणी करून शेत तापू देण्यात आले. त्यानंतर अनेकांनी रोटाव्हेटरने शेत भुसभुशीत करून घेतले. पूर्वहंगामी लागवडीसाठी १०० टक्के शेतकरी ठिबकचा खानदेशात उपयोग करतात.

यामुळे लागलीच ठिबक संच व्यवस्थितपणे टाकण्याचे काम सुरू झाले. हे या महिन्यात गतीने सुरू होते. ते या आठवड्यात अनेकांनी पूर्ण केले आहे. कापूस बियाणे १५ मेपासून उपलब्ध होणार असल्याने त्याची खरेदी करून याच महिन्यात लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे.

Cotton Crop
Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

खानदेशात मागील तीन-चार दिवसांत उष्णता कमी झाली आहे. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. सध्या कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसवर आहे. पुढे तापमानात जशी घट होईल, तशी लागवड होईल.

अनेक शेतकरी २५ मेनंतर लागवड करतील. तर काही शेतकरी १ जून रोजी लागवडीला सुरुवात करणार आहेत. जूनमध्ये तापमानात घट होईल. तसेच ढगाळ वातावरणदेखील तयार होईल. या स्थितीत अनेक शेतकरी कापूस लागवडीस सुरुवात करतात.

अनेकांनी चार बाय दीड फूट, तीन बाय दोन फूट या अंतरात कापूस लागवडीचे नियोजन केले आहे. काहींनी चार बाय दोन फूट या अंतरात कापूस लागवडीचे नियोजन केले आहे. काळ्या कसदार जमिनीत लागवडीसाठी गादीवाफेही अनेकांनी तयार केले आहेत. कारण अतिपावसात पिकाची हानी होते. यात गादीवाफ्यांमुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com